हेमांगी कवी म्हणते, माझ्यासाठी ‘ही’ भूमिका आव्हानात्मक होती

विनोदी अभिनय, रोमँटिक गाणी, उत्तम कथा, तसेच सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, महेश मांजरेकर, राणी अग्रवाल यांच्यासारख्या मनोरंजक कलाकारांच्या सहाय्याने या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Mumbai
hemangi kavi
माझ्यासाठी ही भूमिका साकारणे आव्हानात्मक

‘सर्व लाईन व्यस्त आहेत’, हा सिनेमा १ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला असून अतिशय चांगल्या प्रकारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. विनोदी अभिनय, रोमँटिक गाणी, उत्तम कथा, तसेच सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, महेश मांजरेकर, राणी अग्रवाल यांच्यासारख्या कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अभिनेत्री हेमांगी कवीने आतापर्यंत अनेक विनोदी भूमिका साकारल्या आहेत. मग ‘फू बाई फू’ असो किंवा ‘ती फुलराणी’. तिचा उत्तम अभिनय सर्वांनाच पोट धरुन हसायला भाग पाडतो. सर्व लाईन व्यस्त आहेत, या चित्रपटात तिची भूमिका, सह-कलाकारांचे कौतुक आणि हा सिनेमा का पाहावा? याविषयी तिने बरंच काही सांगितले आहे.

हे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते

मी या चित्रपटात प्रियांका नावाचे पात्र साकारले आहे. प्रियांका म्हणजेच प्रमेळ, माया देणारी असे आपल्याला वाटते. पण माझं पात्र अगदी या उलट आहे. जरी माझं पात्र थोडं ग्रे शेड वाटणारं असलं तरी देखील ते विनोदी, सिच्युएशनला कॉमेडी करणार (करणारं) आहे. प्रिमिअरला प्रेक्षकांच्या रिअॅक्शन अपेशित होत्या. त्याहून अधिक चांगल्या आमच्यापर्यंत पोहोचल्या. जेव्हा माझ्या पात्राबद्दल मला सांगितले तेव्हा मला ते अशक्यच वाटलं, अख्ख्या फिल्ममध्ये माझे हात-पाय बांधलेले असणार असं असूनही मी सौरभ आणि सिद्धार्थ दोघांवरही दरारा निर्माण करायचा आहे. मला बांधळं (बांधलं) गेलंय मी यांच्यावर कसा दरारा निर्माण करणार? हाच विचार मी करत होती. पण खरं तर मला बांधलेलं असून मी समोरच्यावर कसा दरारा निर्माण करते, हीच खरी गंमत या चित्रपटात आहे. मला पुर्णपणे डोळ्यातून व्यक्त व्हायचं होतं आणि हेच माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं, असं हेमांगी कवीने म्हटलं आहे.

एनर्जी मॅच करणं माझ्यासाठी अतिशय कठीण

विनोदाचा बादशाह सिद्धार्थ, संस्कृती आणि सौरभ यांच्याविषयी बोलताना तिनं सांगितले की, संस्कृती उत्तम रिअॅक्टर आहे. तिला कोणतीही सिच्युएशन दिली तर ती त्या प्रमाणे उत्तम रिऍक्ट करेल. संस्कृतीमुळे मला एका विशिष्ट अॅक्शनला छोटीशी रिअॅक्शन देऊन लाफ्टर होऊ शकतो, हे शिकायला मिळालं. सौरभ आणि मी ‘तू माझा सांगाती’ मध्ये एकत्र काम केलंय आणि आता हा विनोदी सिनेमा ज्यामध्ये सौरभने खूप छान कॉमेडी केली आहे. सिद्धार्थ खूप उत्साही कलाकार आहे, त्याच्याविषयी जितकं बोलू तितकं कमीच आहे. मला इतकंच टेंशन होतं की मी त्याची एनर्जी मॅच करु शकेल का? कारण त्याची एनर्जी मॅच करणं माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं.

अमोल उतेकर प्रस्तुत, स्टेलारिया स्टुडिओ निर्मित आणि प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित सर्व लाईन व्यस्त आहेत. हा सिनेमा १ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. दोन-अडीच तास प्रेक्षकांचे छान मनोरंजन होईल. फॅमिलीसोबत जाऊन दोन- अडीच तास सिच्युएशनमध्ये अडकून सिनेमात लोकांची कशी फजिती होते आणि ते सीन्स आपल्याला कसे हसायला भाग पाडतात आणि विनोदी सिनेमाची मजा घेण्यासाठी प्रेक्षकांनी नक्की पाहावा ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’, असे हेमांगीने म्हटले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here