घरमनोरंजनफ्लिपकार्टची निर्मीती असलेल्या वेबसिरीजमध्ये 'ही' अभिनेत्री दिसणार!

फ्लिपकार्टची निर्मीती असलेल्या वेबसिरीजमध्ये ‘ही’ अभिनेत्री दिसणार!

Subscribe

भारतातील आणखी कंपनी आता वेबसिरीजच्या निर्मीतीत पदार्पण करत आहे. ही कंपनी आहे आतापर्यंत ऑनलाईन शॉपिंग करण्यामध्ये अग्रगण्य वेबसाईट आहे. आता या प्लॅटफॉर्मच्या माध्यामातून फ्लिपकार्टने आता मनोरंजन क्षेत्रात देखील पाऊल ठेवले आहे. आजच्या तरूणाईची आवड लक्षात घेऊन अधिक उत्कंठा निर्माण करणारे,आकर्षक कंटेट फ्लिपकार्ट व्हिडीओ ओरिजिनल्स उपलब्ध करणार आहे.

फरहा खान संचालित ‘बॅकबेंचर्स’ ही पहिली ओरिजिनल मालिका या महिन्यातच उपलब्ध होणार असून या मालिकेत भारतातील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटीज भूतकाळातील आठवणींना उजळा देताना दिसतील. “अत्यंत काळजीपूर्वक बनवलेल्या व निवडलेल्या साधन-साहित्याच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांच्या आयुष्यात सकारात्मक भर घालणे हे फ्लिपकार्टचे एकमेव उद्दिष्ट आहे. आम्ही काही महिन्यांपूर्वी आमची व्हिडिओ सेवा सुरू केली, त्यावेळी आमचे ध्येय स्पष्ट होते. इंटरनेटचा वापर करणाऱ्या, पण ई-कॉमर्सपासून काही कारणांनी लांब राहिलेल्या ग्राहकांना जोडण्यात भूमिका बजावण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. ही सेवा सुरू झाल्यापासून पहिल्या दोन महिन्यांतच ग्राहकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. या प्रतिसादामुळेच प्रोत्साहित होत आम्ही आता आमच्या ग्राहकांसाठी ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ हे नवे आकर्षण घेऊन आलो आहोत’. असे फ्लिपकार्ट ओरिजनलचे उपाध्यक्ष प्रकाश सिकरीया म्हणाले.

- Advertisement -

मोबाइलचा वापर नजरेसमोर ठेवून बनवलेल्या व्हिडिओंच्या युगात प्रवेश करत असताना देशभरातील लोकांच्या आशाअपेक्षांशी मेळ खाईल, अशा प्रकारच्या कलाकृती बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे.असेही ते पुढे म्हणाले. त्याचप्रमाणे बॉलिवूडकरांच्या आठवणी प्रेक्षकांचा आकर्षणाचा विषय ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -