घरमनोरंजन'या' चित्रपटाने केली 'पानीपत' पेक्षा जास्त कमाई!

‘या’ चित्रपटाने केली ‘पानीपत’ पेक्षा जास्त कमाई!

Subscribe

बॉलिवुड चित्रपट पती पत्नी और वो आणि पानिपत हे रिलीज झाले आहेत. काल बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांचा पहिला दिवस होता तर या चित्रपटांनी पहिल्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घ्या.

‘जोधा अकब’र आणि ‘मोहेंजो दारो’ सारख्या भन्नाट एतिहासिक चित्रपटानंतर दिगदर्शक आशुतोष गोवारीकर पुन्हा एकदा एका एतिहासिक चित्रपटासोबत परतले आहे. पानिपतच्या लढाईवर आधारित असलेला पानिपत हा एतिहासिक चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक होते. मुख्य भूमिकेत अर्जून कपुर, क्रिती सनॉन आणि संजय दत्तसारख्या कलाकारांना एकत्र काम करताना पाहायला प्रेक्षकांची आतुरता ही द्विगुणित झाली होती. तर कालच या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर पहिला दिवस होता. मात्र इतक्या प्रमोशन नंतरही बॉक्स ऑफिस इंडियाच्याप्रमाणे पानिपतची पहिल्या दिवसाची कमाई काही फार झाली नाही. ४-४.२५ करोडची कमाई पानिपतनं पहिल्या दिवशी केली. तर ही रक्कम मरजावां आणि कमोंडो ३ या चित्रपटांपेक्षा देखील कमी आहे.

ही रक्कम कमी जरी असली तरी अर्जून कपुरच्या मागिल दोन चित्रपटांपेक्षा पानिपतनं आतापर्यंत जास्त कमाई केली. महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट चांगला चाललेला आहे मात्र उत्तर भारताच्या भागात हा चित्रपट पडला आहे. मराठा आणि अफगाणिस्तानच्या राजामधील पानिपतच्या तिसऱ्या युध्दावर आधारित हा चित्रपट आहे. मात्र संजय दत्तच्या लूक प्रेक्षकांना फार आवडलेला आहे.

- Advertisement -

तर या चित्रपटाच्या सविस्तर review साठी पाहा हा व्हिडिओ:

- Advertisement -

तर त्या दरम्यान पानिपतबरोबर पती पत्नी और वो हा चित्रपट देखील रिलीज झाला आहे. हा चित्रपट दिग्दर्शक मुदस्सिर अझीझ यांच्या याच नावाच्या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत कार्तिक आर्यन, भूमि पेडनेकर आणि बॉलिवुडची नवीन कलाकार अनन्या पांडे देखील आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसच्या पहिल्या दिवशी ८.५०-८.७५ करोड रुपये कमवून पानिपतला देखील मागे टाकलेलं आहे.

या दिलेल्या रक्कम रिलीज होण्याच्या पहिल्याच दिवशीच्या असून पुढे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखी चाळणार का हे पाहण्यासाठी मात्र वाट पाहावं लाहणार.


हेही वाचाः ठरलं! तान्हाजी चित्रपट मराठीत येणार; ‘या’ दिवशी होणार ट्रेलर आऊट!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -