घरताज्या घडामोडीसुशांतने केलं होतं हॉलिवूड पर्दापणाचं प्लॅनींग, डायरीची १५ पानं आली समोर!

सुशांतने केलं होतं हॉलिवूड पर्दापणाचं प्लॅनींग, डायरीची १५ पानं आली समोर!

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आता दोन महिने उलटले आहेत. या दोन महिन्यात सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. आता सुशांतच्या डायरीचे आणखी काही पानं पुढे आली आहेत. या पानात सुशांतने हॉलिवूड पर्दापणापासून ते कंपनीच्या भविष्यातील वाटचालींचे नियोजन केल्याचं दिसत आहे. या डायरीत सुशांतच्या बहिणाचाही उल्लेख असून अभियन क्षेत्रातील करिअर अधिक चांगले करण्यासाठी काय करता येऊ शकेल याचीही मुद्देसूद आखणी त्याने केली होती.

- Advertisement -

काय काय आहे डायरीत

सुशांतने या डायरीत आपल्या कंपनीबद्दल प्लॅनींग केलं आहे. सुशांतच्या डायरीत बहिण प्रियांकाचाही उल्लेख आहे. प्रियांका सुशांतच्या टीमला हॅंडल करेल असे त्याने डायरीत लिहिले आहे. त्याचबरोबर आपली अभिनय कारकीर्द सावरण्यासाठी काय करता येईल, याबाबतही सुशांतने विचार करून ठेवला होता. त्याचबरोबर कोणत्या अडचणी येऊ शकतात, याचाही विचार त्या डायरीत सुशांतने केला आहे.

एका पानात सुशांतने फ्लो चार्ट तयार करीत आपल्या गरजा आणि पब्लिक प्रेजेंसबाबत तक्ता तयार केला आहे. सुशांतने एका पानावर लिहिलं आहे की, ‘माझी इच्छा आहे की लोकांनी मला समजून घ्यावं.’ त्याचबरोबर एखादा सीन उठावदार होण्यासठी कोणता प्रयोग आणि कोणती पध्दत वापरली पाहिजे, त्याची तयारी कशी करावी याविषयी सुशांतने या डायरीत लिहिलं आहे. आपली वाक्य पाठ करु नका, ती फील करा आणि नंतर कॅमेर्‍यासमोर म्हणा, असेही त्याने लिहिले आहे.

- Advertisement -

लेखकांची लीग तयार करण्याचा विचार

सुशांत चांगल्या लेखकांच्या माध्यमातून चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात होता. त्यामुळेच तो आपली टीम बनवण्यासोबतच लेखकांची लीग तयार करण्याच्याही विचारात होता. जेणेकरुन चांगले लेखन करणारे पटकथाकार आणि त्यांच्या स्क्रिप्ट कोणालाही उपलब्ध होतील.

कंपनीला करायचं होतं मोठं

डायरीतील या पानांमध्ये सुशांतने हॉलिवूडला जाण्याची पूर्ण तयारी केली होती. याशिवाय स्टार्टअपमध्ये गुंतवणूक, कुटुंबातील कोणत्या सदस्याला कोणती जबाबदारी, कंपनी वाढविण्यासाठी काय करता येऊ शकतं आदी गोष्टींबाबत लिहिलं आहे.


हे ही वाचा – ‘गुंजन सक्सेना’ : भारतीय हवाई दलाचा अपमान? IAF ने सेन्सॉर बोर्डाला पाठवलं पत्र!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -