घरमनोरंजन'2.0' ची कमाई वाढता वाढता वाढे...

‘2.0’ ची कमाई वाढता वाढता वाढे…

Subscribe

'२.०' चित्रपटाने रिलीज झाल्यापासून अातापर्यंत तब्बल ४०० कोटी रुपयांची भरघोस कमाई केली आहे.

बॉलीवूडच्या ‘खिलाडी’ अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘२.०’ चित्रपटाने जबरदस्त गल्ला कमावला आहे. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपचटांच्या कमाईचे रेकॉर्ड मोडणाऱ्या ‘२.०’ने आतापर्यंत घसघशीत कमाई केली आहे. या चित्रपटाने रिलीज झाल्यापासून अातापर्यंत तब्बल ४०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. जवळपास ५५० कोटी रुपयांच्या आसपास निर्मीती खर्च असलेल्या या चित्रपटाची कमाईची घोडदौड जोरात सुरु आहे. हा चित्रपट  तेलुगू, तमिळ आणि हिंदी अशा ३ भाषांमध्ये हा प्रदर्शित करण्यात आला आहे. २९ नोव्हेंबरला अर्थात रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने १०० कोटींची धमाकेदार कमाई केली होती. कमाईच्या आकडेवारीवरुन अक्षय कुमार आणि रजनीकांतचे चाहते या चित्रपटाला भरभरुन पसंती देत आहेत असंच म्हणावं लागत आहे. 3D तंत्रज्ञान, स्पेशल ईफेक्ट्स आणि ग्राफिक्सची भरमार असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी लोक स्वत:हून थिएटरकडे वळत आहेत. याचाच चांगला परिणाम चित्रपटाच्या कमाईच्या आकडेवारीवर होत आहे आणि हा ‘२.०’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरत आहे.


एस. शंकर दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट सुमारे साडेपाचशे कोटी रुपये इतके आहे. मात्र, चित्रपटाची भव्यता पाहता चित्रपट लवकरच ६०० कोटींचा आकडा पार करेल अशी चर्चा रंगते आहे. २.० हा सिनेमा तेलगू आणि हिंदीमध्ये डब करण्यात करण्यात आला आहे. सिनेमातील VFX मुळे हा सिनेमा लहान मुलांना देखील आवडत आहे. शिवाय हा सिनेमा 3D आणि 2D दोन्हीमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. हॉलीवूडला टक्कर देणारे VFX या सिनेमात असल्यामुळे ते पाहण्यासाठी आणि २.० रजनीकांतचा नवा अवतार पाहण्यासाठी सिनेमागृहामध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -