घरताज्या घडामोडीअभिनेत्रीवर बलात्कार करताना आरोपीने व्हिडिओ केला शूट, तक्रार दाखल!

अभिनेत्रीवर बलात्कार करताना आरोपीने व्हिडिओ केला शूट, तक्रार दाखल!

Subscribe

पश्चिम बंगालमधील कोलकता शहारातील बिजॉयगड परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका २६ वर्षीय अभिनेत्रीवर ओळखीच्या इसमाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपीने या तीच्या घरातच तिच्यावर बलात्कार केल्याचं म्हटलं जात आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संबंधी वृत्त दिलं आहे.

अभिनेत्रीने ८ जुलैला जादवपूर पोलीस स्थानकामध्ये बलात्काराची तक्रार नोंदवली. यानंतर या अभिनेत्रीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ५ जुलैला एक व्यक्ती या अभिनेत्रीच्या घरी आर्थिक मदत मागण्यासाठी आला होता. त्यावेळी घरात ती एकटीच असल्याचे पाहून त्याने तिच्यावर बलात्कार केला. अशी माहिती पोलिसांच्या सुत्रांनी दिली.

- Advertisement -

या अभिनेत्रीने तक्रारीत म्हटले आहे की, माझ्यावर बलात्कार होत असताना त्या व्यक्तीने त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केलं आहे. तसेच यासंदर्भात कुठे वाच्यता केल्यास हा व्हिडिओ आपण व्हायरल करु अशी धमकी त्याने दिली. या धमकीला घाबरुन प्रसंग घडल्यानंतर काही दिवस ही अभिनेत्री पोलिसांकडे आली नव्हती. अखेर ८ जून रोजी तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

लॉकडाउनच्या कालावधीमध्ये फेसबुकवरुन या मुलाने अभिनेत्रीला संपर्क केला आणि भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आधी तिने त्याला भेटण्यास नकार दिला. मात्र नंतर या तरुणाने लॉकडाउनमुळे आर्थिक नुकसान झाल्याने मदत हवी असल्याचं या अभिनेत्रीला सांगितलं. या अभिनेत्रीने या मुलाला पैसे घेण्यासाठी घरी बोलवलं. त्याचवेळी हा सर्व प्रकार घडल्याच अभिनेत्रीने सांगितलं.

- Advertisement -

हे ही वाचा – चीनला मोठा धक्का! १ मिनिटात फुटलं रॉकेट, २ उपग्रह ही झाले नष्ट!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -