ऐश्वर्याच्या मुलाने केली तिच्यासोबत राहण्याची मागणी; पाहा ‘त्याचा’ फोटो

Mumbai
32 year old man claims he is the daughter of bollywood actor aishwarya rai bachchan
ऐश्वर्याच्या मुलाने केली तिच्यासोबत राहण्याची मागणी; पाहा 'त्याचा' फोटो

काही दिवसांपूर्वी केरळमधील करमाला मोडेक्स या महिलेने प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल या आई असल्याचा दावा केला होता. तसेच तिने थिरुवनंतपुरम जिल्हा कौटुंबिक न्यायालयात पौडवाल यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. याशिवाय ५० कोटींची नुकसाना भरपाईचीही मागणी केली होती. यासंदर्भात पौडवाल यांना नोटीस बजावली असून २७ जानेवारीला कोर्टात हजर राहायला सांगितले आहे. आता याप्रकरणानंतर बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही आपली आई असल्याचा दावा एका तरुणाने केला आहे. तसंच त्याने आपल्या आई म्हणजेच ऐश्वर्या सोबत मुंबईत राहायची इच्छा असल्याचे सांगितले आहे. हा तरुण ३२ वर्षांचा असून आईव्हीएफ द्वारे लंडनमध्ये त्याचा जन्म झाला असल्याचे सांगितले आहे. स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार हे प्रकरण समोर आले आहे.

या तरुणाचे नाव संगीत कुमार असून त्याच्या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. १९८८ मध्ये या तरुणाचा जन्म झाला होता त्यावेळेस ऐश्वर्या ही अवघ्या १५ वर्षांची होती.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत त्याने ऐश्वर्या राय ही त्याची आई असल्याचा दावा केला आहे. तसंच आपला जन्म लंडनमध्ये आईव्हीएफ द्वारे झाला असल्याचा दावाही केला आहे. त्याच्या जन्मानंतर दोन वर्षे ऐश्वर्याचे आई वडील वृंदा राय आणि दिवंगत कृष्णराज राय यांनी सांभाळ केला. त्यानंतर त्याचे वडील वदिवेलू रेड्डी यांनी विशाखापट्टणम येथे घेऊन आले. जन्मासंबंधीचे सर्व पुरावे त्याचा नातेवाईकांनी नष्ट केले असल्याचे त्याने सांगितलं आहे.

View this post on Instagram

✨🥰We LOVE YOU ETERNALLY ❤️✨😘

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

सध्या या व्हिडिओवर नेटकरी तुफान प्रतिसाद देत आहेत. यासर्व प्रकरणावर अजून ऐश्वर्याने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


हेही वाचा – शुभ्रा- सोहमची पहिली संक्रांत!