पुरुषावरही बलात्कार होतो; ३७६ D चित्रपटातून पुरुषांवरील लैंगिक अत्याचारावर भाष्य

९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट यापूर्वीही अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविला गेला आहे. चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून प्रत्येकाने त्याच्या कथेचे कौतुक केले आहे.

कोर्टरूम ड्रामावर आधारित बरेच चित्रपट बॉलिवूडमध्ये बनले आहेत. ९० च्या दशकात दामिनी असो किंवा २०१६ मधील पिंक हा चित्रपट. अशा चित्रपटांना प्रेक्षकांकडून खूप पसंती दिली जाते आणि अशा विषयाचे चित्रपट प्रेक्षकांना बांधून ठेवते. परंतू असे बरेच चित्रपट आहेत जे वेगळी कथा सांगून प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडतात. असाच एक चित्रपट म्हणचे ३७६ डी.

चित्रपटाच्या नावानुसार हा चित्रपट सामूहिक बलात्कारासारख्या भयंकर गुन्ह्याभोवती फिरतो. हाथरस घटनेनंतर लोकांचा रोष प्रचंड आहे. परंतु पीडित मुलीची कहाणी या चित्रपटात दर्शविली जाणार नाही. त्याऐवजी या चित्रपटाच्या कथेनुसार एक मुलगा सामूहिक बलात्काराचा शिकार झाला असून त्याला त्याच्या हक्कासाठी संघर्ष करावा लागल्याचे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या घटनेनंतर चित्रपटात कोर्ट ड्रामा देखील पाहायला मिळणार आहे. ९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट यापूर्वीही अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविला गेला आहे. चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून प्रत्येकाने त्याच्या कथेचे कौतुक केले आहे. अशा परिस्थितीत प्रेक्षकांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होण्याची उत्सुकता आहे.

या चित्रपटात फारसा मोठा चेहरा दिसणार नाही, परंतु असे म्हटले जात आहे की, या कलाकारांमुळे हे इंटेंस कोर्ट ड्रामा उत्तम प्रकारे पूर्ण केले गेले आहे. या चित्रपटात विवेक कुमार, दीक्षा जोशी, सुमित सिंह सिकरवार, प्रियंका शर्मा असे कलाकार दिसणार आहेत. त्यापैकी बर्‍याच जणांना थिएटरची पार्श्वभूमी आहे. अशा परिस्थितीत जर प्रत्येकाची चित्रपटातील अभिनय फारच स्वाभाविक दिसत असेल तर आश्चर्य वाटायला नको. ३७६ डी चे दिग्दर्शन गुणवीन कौर आणि रॉबिन यांनी केले असून चित्रपटाची कहाणीही या दोघांनी लिहिली आहे.


टिकटॉक स्टार प्रतीक खत्रीचा भीषण कार अपघातात मृत्यू