घरमनोरंजनभारत-चीन युद्धातील 'त्या' वीराची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर

भारत-चीन युद्धातील ‘त्या’ वीराची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर

Subscribe

१९६२ च्या भारत - चीन युद्धात शत्रुला तब्बल ७२ तास एकट्याने थोपवून धरणाऱ्या जसवंत सिंह रावत यांची शौर्यगाथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. 

‘७२ अवर्स : मार्टायर हू नेव्हर डाईड’ हा चित्रपट आज १८ जानेवारीला देशभरात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाची कथा देशासाठी सर्वात मोठे बलिदान देणारे वीर जसवंत सिंह यांच्या आयुष्यावर आधारित आहे. ‘महावीर चक्र’ मिळालेले जयवंत सिंह यांच्या रोमहर्षक बलिदानाची कहाणी या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा जिवंत करण्यात आली आहे. ‘७२ अवर्स : मार्टायर हू नेव्हर डाईड’ या चित्रपटातून  १९६२ च्या भारत – चीन युद्धाचा थरार प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या युद्धात चिनी शत्रूला तब्बल ७२ तास एकट्याने थोपवून धरणाऱ्या जसवंत सिंह रावत यांची शौर्यगाथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. महावीर सिंह यांनी त्या महायुद्धात शत्रूला केवळ रोखलंच नव्हतं तर स्वबळावर जवळपास ३०० शत्रूंचा खात्मा केला होता. ‘७२ अवर्स : मार्टायर हू नेव्हर डाईड’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन  अविनाश ध्यानी यांनी केलं आहे. तसंच चित्रपटातील अविनाश ध्यानींची प्रमुख भूमिकाही जसवंत सिंह रावत यांनीच साकारली आहे.

रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुमारे १२ करोड रुपयांचा खर्च झाला असून, चित्रपटाचं शुटिंग उत्तराखंडमधील चकराता, गंगोत्री, हर्सिल तसंच हरियाणातील रेवाडी आदी रिअल लोकेशन्सवर झालं आहे.

- Advertisement -

भारत आणि चीन या दोन देशांमध्ये १९६२ साली खूप मोठे युद्ध झाले होते. त्यावेळी वीर जसवंत सिंह तवांग जिल्ह्याच्या नुरांग येथे रेजिमेंटमधील चौथ्या गढवाल पोस्टवर तैनात होते. या महायुद्धामध्ये प्रबळ चीनसमोर भारत प्रत्येक गोष्टीत मागे पडत होता. त्यामुळे जसवंत सिंह यांच्या बटालियनला मागे हटण्याचे आदेश देखील मिळाले होते. मात्र, जसवंत सिंह यांनी त्यांचे दोन सहकारी गोपाल सिंह गुसाई आणि त्रिलोक सिंह नेगी यांच्यासह त्याच पोस्टवर थांबण्याचा निर्णय घेतला. या तीन वीर जवानांनी मिळून शत्रूच्या एका बंकरवर हल्ला चढवला आणि त्यांच्या मशीनगन्सचा ताबा घेतला. यामुळे खवळलेल्या चीनी सैन्याच्या एका मोठ्या तुकडीने बंकरवर हल्ला चढवला. मात्र, यामुळे जसवंत सिंह जराही डगमगले नाहीत. त्यांनी आपल्या दोन्ही सहकाऱ्यांचे तरी प्राण वाचावेत यासाठी त्यांना तिथून जायला सांगितले आणि एकट्याने संपूर्ण बंकरचा ताबा घेतला. त्यानंतर तब्बल ७२ तास ते एकट्यानेच शत्रूंवर गोळीबार करत राहिले. जिवात जीव असेपर्यंत त्यांनी देशाच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. अशा या वीर योद्ध्याची वीरगाथा  ‘७२ अवर्स : मार्टायर हू नेव्हर डाईड’ या चित्रपटातून अनुभवता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -