घरमनोरंजनऑस्करची नामांकने जाहीर, जोकरची बाजी!

ऑस्करची नामांकने जाहीर, जोकरची बाजी!

Subscribe

९२ व्या अकॅडमी अवॉर्डस अर्थात ऑस्कर पुरस्कारांची नामांकने जाहीर झाली आहेत. १० फेब्रुवारीला भारतीय वेळेनुसार ऑस्कर सोहळा रंगणार आहे. यावर्षी क्विंटन टरँटिनोचा ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड’ आणि टोड फिलिप्सचा ‘जोकर’ ऑस्करच्या स्पर्धेत सर्वात पुढे आहे. भारताकडून ऑस्करसाठी झोया अख्तरचा ‘गली बॉय’ हा सिनेमा पाठवण्यात आला होता. तो स्पर्धेबाहेर गेला आहे. शेफ ते फिल्ममेकर प्रवास करणाऱ्या विकास खन्नाचा ‘द लास्ट कलर’ हा पदार्पणातील सिनेमा ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे. अभिनेत्री नीना गुप्ता यांची यात प्रमुख भूमिका आहे. बेस्ट फिचर फिल्म कॅटेगरीत हा सिनेमा ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे.

टॉड फिलिप्सचा ‘जोकर’ सर्वाधिक ११ नामांकनांचा मानकरी ठरला आहे. क्वेण्टिन टॅरॅण्टिनोचा ‘वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड’, मार्टिन स्कॉर्सेसीचा ‘द आयरिश मॅन’ आणि सॅम मेंडीसचा ‘१९१७’ या चित्रपटांना प्रत्येकी १० नामांकने जाहीर झाली आहेत. दक्षिण कोरियातील चित्रपट निर्माते बोंग जून हो यांच्या ‘पॅरासाइट’ला उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक आणि उत्कृष्ट पटकथा यासह सहा नामांकने मिळाली आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -