एकाने सलूनमध्ये सोडण्याची सोनू सूदकडे केली मागणी, त्याने दिले भन्नाट उत्तर

एकाच्या मजेशीर ट्विटला सोनू सूदने भन्नाट उत्तर दिले. त्याच्या या ट्विटवर चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस पडला आहे.

Mumbai
a man asked sonu sood to take him to the salon actor hilarious reply
एकाने सलूनमध्ये सोडण्याची सोनू सूदकडे केली मागणी, त्याने दिले भन्नाट उत्तर

लॉकडाऊन दरम्यान बॉलिवूड अभिनेता सोनू सूद स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी व्यवस्था करत आहे. पडद्यावरचा हा खलनायक खऱ्या आयुष्यात रिअर हिरो झाला आहे. त्यामुळे सध्या सोनू सूद सोशल मीडियावर जास्त चर्चेत आहे. सेलिब्रिटीनसह सरकारने देखील सोनू सूदचे कौतुक केले आहे.

बॉलिवूडच्या या अभिनेत्याकडे लोकं ट्विटरच्या माध्यमातून मदत मागत आहेत आणि तो त्याला प्रतिसाद देत आहे. यादरम्यान सोनू सूदला अनेक लोकांनी मजेदार ट्विट देखील केले आहेत. त्यांना देखील सोनू भन्नाट उत्तर देत आहे. नुकतच सोनूला एकाने असं ट्विट केलं आहे की, ‘मी अडीच महिने पार्लरमध्ये गेलो नाही आहे. तर प्लिज तुम्ही मला सलूनमध्ये पोहोचवा.’ तर या ट्विटला सोनू उत्तर देताना म्हणाला की, ‘सलूनमध्ये जाऊन काय करणार? मी तर सलून वाल्याला त्याच्या गावी सोडून आलो. जर त्याच्या पाठोपाठ तुम्हाला गावी जायचं असेल तर सांगा?’, असं मजेशीर उत्तर सोनूने दिलं आहे.

यापूर्वी सोनूने मदतीसाठी मोबाईल नंबर दिला होता. यानंतर अनेक जणांनी त्या नंबरवर मदतीसाठी मेसेज केल आहेत. त्याचा देखील सोनूने व्हिडिओ ट्विटवर शेअर केला होता आणि म्हणाला की, ‘मी आणि माझी टीम सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण यामध्ये काही मेसेज मिस झाले तर मला क्षमा करा.’


हेही वाचा – Coronavirus: लहान मुलांना मास्क घालताय? तर सावधान!