घरमनोरंजनमराठी प्रबोधनचा ‘जल्लोष’

मराठी प्रबोधनचा ‘जल्लोष’

Subscribe

प्रत्येक महाविद्यालयात प्रत्येक भाषिक वाड्.मय मंडळ आहे. भाषेचा प्रचार आणि त्या भाषेचा अभिमान असणार्‍या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे हा या मंडळाचा मुख्य उद्देश आहे. बर्‍याचवेळा विद्यार्थीच सहभागी होऊन या मंडळाचे कार्य करत असतात. के जे सोमय्या कला, वाणिज्य महाविद्यालय आणि इथले प्राध्यापक स्वत:हून विद्यार्थ्यांमध्ये सहभागी होऊन मराठी भाषा प्रबोधनाचे काम करत असतात. हे करत असताना ज्यांनी मराठी भाषा समृद्ध केली, आपल्या क्षेत्रात स्वत:चे असे प्रस्थ निर्माण केले यांचे स्मरणसुद्धा या निमित्ताने केले जाते. त्यासाठी अन्य महाविद्यालयांनाही या उपक्रमात समाविष्ट केले जाते. मराठी प्रबोधनच्या वतीने ‘जल्लोष’ हा विशेष कार्यक्रम केला जातो. जी.ए.कुलकर्णी, आचार्य अत्रे, ज्योत्स्ना भोळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध स्पर्धा भरवल्या जातात.

जी.ए.कुलकर्णी यांचे साहित्यातील योगदान लक्षात घेऊन ‘कथाकथन’ ही स्पर्धा तर आचार्य अत्रे यांनी पत्रकारितेबरोबर नाट्य लेखनाला दिलेले प्राधान्य अधोरेखित करणारी ‘एकपात्री स्पर्धा’ हा त्या उपक्रमातला एक भाग आहे. ज्योत्स्ना भोळे यांनी संगीताच्या क्षेत्रात केलेले कार्य अनमोल आहे. त्यांच्या नावाने ‘सप्तसूर माझे’ ही मराठी सुगम गायन स्पर्धा स्पर्धकांसाठी महत्त्वाची ठरलेली आहे. ‘अभिमान वाटावं असं मराठीत खूप काही आहे. चला आपण त्यात भर घालूया’ असे काहीसे संदेश देऊन स्पर्धक विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाते. सध्या ही स्पर्धा ‘जल्लोष’ या नावाने सुरू आहे, ज्याच्या आयोजनात स्वत: प्राचार्या डॉ. सुधा व्यास, मराठी प्रबोधनच्या कार्याध्यक्षा प्रा. डॉ. वीणा सानेकर सहभागी आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -