Video : ‘अ सूटेबल बॉय’ चा ट्रेलर प्रदर्शित, पण चर्चा रंगली इशान- तब्बूच्या किसींगची!

Mumbai
a Suitable boy

इशान खट्टर आणि तब्बू यांची मुख्य भुमिका असणारा अ सूटेबल बॉय चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सीरीजमध्ये विक्रम सेठ यांचे प्रसिध्द पुस्तकातील कथा दाखवण्यात आली आहे. या सिरीजचे दिग्दर्शन मीरा नायर यांच्या या सिरीजची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे.

१९५१च्या भारतावर आधारित अ सूयटेबल बॉय ही ६ भागांची मालिका आहे.  ज्यात लता मेहरा ते माण कपूरपर्यंतच्या कुटूंबाबद्दल सांगण्यात आले आहे. या मालिकेत लता मेहराची आई रूपा मेहरा तिच्यासाठी योग्य मुलगा शोधत आहे, जेणेकरून लता लवकरच लग्न करू शकेल. त्याचवेळी लता तिच्या कॉलेजमधील मुला कबीरच्या प्रेमात पडते. दुसरीकडे, लताची बहीण सविताचा दीर मान कपूरची चर्चा शहरभर सुरू आहे. मान कपूर (ईशान खट्टर) हा एक हट्टी मुलगा आहे, ज्याचे सैदाबाईशी अफेयर आहे. साईदाबाई (तब्बू) ही शहरातील प्रसिद्ध गायिका असून ती मैफिलीमध्ये गात असते.

ट्रेलरमध्ये ईशान खट्टर आणि तब्बू एकत्र दिसतील. दोघांची केमिस्ट्री आणि रिलेशनशिप खूपच सुंदर दाखविण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्यात दाखवण्यात आलेला किसिंग सीनची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या सिरीजमध्ये या दोघांच्या प्रेमकथेशिवाय तुम्हाला लता आणि कबीरची प्रेमकथासुद्धा दिसेल. लताच्या भूमिकेत अभिनेत्री तान्या माणिकटला आणि कबीरच्या भूमिकेत दानेश रिझवी दिसणार आहे.

दिग्दर्शक मीरा नायरची ही टीव्ही मालिका २६ जुलैपासून बीबीसी वन वर दिसणार आहे. मे २०१९ मध्ये याची घोषणा करण्यात आली. ही मालिका अँड्र्यू डेव्हिस यांनी लिहिलेली आहे. त्याचे शूटिंग लखनऊ आणि महेश्वर येथे झाले आहे. ही सिरीज तब्बू आणि ईशान खट्टरसोबत काम करण्याबाबत बरीच चर्चेत आली होती.


हे ही वाचा – बिहारमधील चौकाला सुशांतच नाव, चाहत्यांनी अनोख्या पध्दतीने वाहिली श्रध्दांजली!