घरमनोरंजनभाऊजी आता म्हणणार 'शुरु करो अंताक्षरी'!

भाऊजी आता म्हणणार ‘शुरु करो अंताक्षरी’!

Subscribe

आदेश बांदेकर आता पुन्हा एकदा नवीन रुपात प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. एक अंताक्षरीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ते करणार आहेत.

भाऊजी शब्द उच्चारताच पटकन् डोळ्यासमोर येतात ते अभिनेता आदेश बांधेकर. गेल्या कित्येक वर्षांपासून पैठणीचा खेळ करणारे, राज्यातील वहिनींचे भाऊजी बांधेकर यांनी त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे आजही आपली लोकप्रियता टिकवून ठेवली आहेत. गेली १४ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आलेला पैठणीचा खेळ अजूनही तितकाच रंजक आहे. परंतू आता आदेश भाऊजी एका नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. झी मराठी वाहिनीवर आणखी दोन नवीन कथाबाह्य कार्यक्रम सादर होणार आहेत.

कार्यक्रमाबाबत गुप्तता

फावल्या वेळात सर्वांचं मनोरंजन करणारा खेळ म्हणजे गाण्यांच्या भेंड्या. हाच खेळ या वाहिनीवर एका नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वतः आदेश बांदेकर करणार आहेत. या कार्यक्रमाबद्दलची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. मात्र प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन येणारी ही अंताक्षरी या महिन्याच्या अखेरीस सादर होणार असल्याचे समजते.

- Advertisement -

नव्या रुपात प्रेक्षकांच्या समोर येणार

या कार्यक्रमाबद्दल बोलताना आदेश बांदेकर म्हणाले, “झी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांसाठी वेग वेगळ्या धाटणीचे कार्यक्रम सादर करते. त्यामुळे ही पूर्वीपासून चालत आलेला खेळ एकावेगळ्या आणि रंजक रूपात आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. प्रेक्षक मला ‘होम मिनिस्टर’ नंतर एका वेगळ्या कार्यक्रमात बघणार आहेत. त्यामुळे मी देखील या कार्यक्रमासाठी खुप उत्सुक आहे आणि मी आशा करतो की प्रेक्षकांना देखील ही कार्यक्रम आवडेल.”

आदेश बांदेकर यांना अंताक्षरीचा अनुभव

काही वर्षांपूर्वी आदेशा बांदेकर यांनी दूरदर्शनवरील ताक धिना धिन् का अंताक्षरीवर आधारीत कार्यक्रम होस्ट केला होता. हा कार्यक्रमही खुपच लोकप्रिय ठरला होता. त्यामुळे बांदेकरांना अंताक्षरीचे सूत्रसंचालन करण्याचा जुना आणि दांडगा अनुभव आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -