घरमनोरंजन'८३' चित्रपटात आदिनाथ दिसणार 'या' क्रिकेटरच्या भुमिकेत

‘८३’ चित्रपटात आदिनाथ दिसणार ‘या’ क्रिकेटरच्या भुमिकेत

Subscribe

सध्या ’83 चित्रपटाची चर्चा आहे, आणि या चित्रपटाचे आणखी एक पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ज्यात आपला मराठमोळा अभिनेता आदिनाथ महेश कोठारे दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाच्या या पोस्टरवर दर्शकांच्या शानदार प्रतिक्रिया मिळत आहेत.

- Advertisement -

नुकत्याच, 83 च्या निर्मात्यांकडून सुनील गावस्कर यांच्या भूमिकेसाठी ताहिर राज भसीन, के. श्रीकांत यांच्या भूमिकेसाठी जीवा, मोहिंदर अमरनाथ यांच्या रूपात साकिब सलीम, यशपाल शर्मा यांच्या भूमिकेत जतिन सरना, संदीप पाटिल यांच्या रूपात चिराग पाटिल, कीर्ति आज़ाद यांच्यासाठी दिनकर शर्मा, रोजर बिन्नी यांच्या भूमिकेसाठी निशांत दहिया, मदन लाल यांच्यासाठी हार्डी संधू आणि सैयद किरमानी यांच्यासाठी साहिल खट्टर तसेच, बलविंदर सिंह संधू यांच्या भूमिकेसाठी एम्मी विर्क यांचे फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या दिग्गज नावांमध्ये दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेसाठी आदीनाथ कोठारे यांच्या नावाची वर्णी लागली आहे. चित्रपटातील कपिल देव यांच्या भूमिकेत रणवीर सिंह यांच्या फर्स्ट लुकने 83 विषयीची दर्शकांची उत्कंठा आधीच वाढवलेली असताना यात आणखी एक नाव आता जोडले गेले आहे.

- Advertisement -

२५ जून १९८३ ला लंडनमधील लॉर्डसच्या मैदानावर भारतीय संघाने किक्रेट विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे केवळ देशातून नाही तर संपूर्ण जगातून भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक झाले. त्यामुळे ही तारीख भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरली गेली. याच विजयावर ‘८३’ हा चित्रपट आधारीत आहे. हा चित्रपट येण्यासाठी तब्बल २ वर्षं वाट पहावी लागणार असून हा चित्रपट २०२० च्या १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा १९८३ च्या किक्रेट विश्वचषक विजयावर आधारीत ‘८३’ हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -