घरमनोरंजनआकाश - श्लोका उद्या होणार 'एंगेज्ड'

आकाश – श्लोका उद्या होणार ‘एंगेज्ड’

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून आकाश अंबानी आणि श्लोका यांच्या साखरपुड्याची चर्चा रंगत होती. त्यांच्या गोव्यातली प्री- एगेजमेंट फोटो शूटनंतर या बातमीवर शिक्कामोर्तब झाले. काल मुंबईतल्या अंबानी यांच्या मलबार हिलमधील बंगल्यावर प्री एंगेज्मेंट पार्टी झाली. आणि आता ही दोघं उद्या ऑफिशिअल एंगेज्ड होणार आहेत. आकाश अंबानी हा मुकेश आणि नीता अंबानी यांचा मुलगा असून रिलायन्स जीओचा सर्वेसर्वा आहे.

सेलिब्रिटींची हजेरी

अंबानीच्या या प्री- एंगेजमेंट पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. शाहरुख- गौरी खान, रणबीर कपूर, आलिया भट, करण जोहर, अंजली- सचिन तेंडुलकर यांनी हजेरी लावली. पण या सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. त्या प्रियांका चोप्रा आणि नीक जोन्सवर देसी गर्ल नीक बरोबर अंबानींच्या घरी पोहोचली आणि सगळ्यांनी तिला कॅमेऱ्यात कैद केले.

- Advertisement -

गुजराती पद्धतीने श्लोकाचे स्वागत

उद्या मलबार हिल परीसरात उद्या आकाश आणि श्लोका एंगेज्ड होणार आहे. दरम्यान काल तिचं अंबांनीच्या घरात गुजराती पद्धतीने स्वागत करण्यात आले. नीता अंबांनीची मुलगी इशा अंबांनी हिने नव्या वहिनीला ओवाळले. यावेळी श्लोका इशाच्या पाया पडली. हा व्हिडिओदेखील सध्या व्हायरल होत आहे.

 

- Advertisement -

नीता अंबानीचा परफॉर्मन्स

नीता अंबानीने या कार्यक्रमात गुजराती गाण्यावर नृत्य सादर केले. यावेळी त्यांनी घातलेल्या डीझायनर वेअरची चर्चाही रंगली. बघा हा परफॉर्मन्स

 

या शिवाय नीता अंबानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटोदेखील शेअर केले आहेत.

No one can match her awesomeness!! The best!! #NitaAmbani

A post shared by Nita Ambani (@nitamambani) on

#IshaAmbani (? – @vardannayak)

A post shared by Nita Ambani (@nitamambani) on

कोण आहे श्लोका मेहता?

श्लोका हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी आहे. ती तिच्या वडिलांच्या कंपनीत संचालकपदावर कार्यरत आहे. आकाश आणि श्लोका धीरुभाई अंबानी शाळेत एकत्र शिकायला होते. आकाश आणि श्लोका लहानपणापासून एकमेकांना ओळखतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -