पाकिस्तानचे प्रेम आमिरवर बरसले

कोणत्याही कटशिवाय पाकिस्तानमध्ये आमिर खान आणि अमिताभ बच्चनचा चित्रपट ठग्ज ऑफ हिंदोस्तान प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Mumbai
Thugs of Hindostan trailer launch LIVE updates
Thugs of Hindostan

आमिर खान आणि अमिताभ बच्चनचा चित्रपट ठग्ज ऑफ हिंदोस्तान दोन दिवसात प्रदर्शित होत आहे. मेगास्टार आणि बहुचर्चित असणार्‍या या चित्रपटात पहिल्यांदाच हे दोन तगडे कलाकार समोरासमोर उभे ठाकले आहेत. ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटाकडून प्रेक्षकांनाही खूपच अपेक्षा आहेत. दरम्यान केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कोणत्याही कटशिवाय पाकिस्तानमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येते आहे.

पाकिस्तानात हिंदी चित्रपटांवर बंदी

पाकिस्तानमध्ये हिंदी चित्रपटांवर बंदी आहे. मात्र पाकिस्तानचे प्रेम सध्या आमिरवर बरसले आहे. चित्रपटाचा कोणताही भाग कट न करता संपूर्ण चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सध्या समोर येत आहे. पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार आमिरने त्याचा सिक्रेट सुपरस्टारदेखील मागच्यावर्षी पाकिस्तानमध्ये प्रदर्शित केला होता. त्यामुळे आता आपला ठग्ज ऑफ हिंदोस्तानही आमिर पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करू इच्छित आहे. दरम्यान पाकिस्तानमध्ये आमिरचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे या निर्णयामुळे ते नक्कीच खूश होतील.

कलेक्शनवर पडेल फरक

आमिरला पाकिस्तानकडून मिळालेल्या या सुविधेमुळे आता ठग्ज ऑफ हिंदोस्तानच्या कलेक्शनवरही नक्कीच सकारात्मक फरक पडण्याची आशा आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे चित्रपटाकडून आता प्रेक्षकांच्याही आशा आता वाढल्या आहेत. शिवाय आमिर आणि अमिताभ या दोघांबरोबर कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्याही प्रमुख भूमिका या चित्रपटामध्ये आहेत. त्यामुळे ग्लॅमरचा तडकाही या चित्रपटाला मिळाल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. लवकरच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे कळेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here