आशुतोष राणा ‘चौरंगी’ भूमिकेत…पाहा Video

दमदार अभिनय करणारा आशुतोष राणा आता 'चौरंगी' भूमिकेत दिसणार आहे. आशुतोष राणा साकारत असलेल्या या ४ रोल्सची सध्या चर्चा रंगते आहे.

Mumbai
प्रातिनिधिक फोटो

अभिनेता आशुतोष राणा म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतो, दुश्मन सिनेमामधला ‘गोकूळ’. दुश्मन सिनेमामध्ये आशुतोषने साकारलेला क्रूरकर्मा गोकूळ आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. आशुतोष राणाने आपल्या दमदार अभिनयाने आणि विविधरंगी भूमिकांनी नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आगामी ‘धडक’ सिनेमातही आशुतोष राणा झळकणार आहे. मात्र, याशिवाय तो अजून एका कारणामुळे सध्या चर्चेत आहे. आशुतोष राणाचा ‘ये कैसा तिगडम’ हा नवा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून, यामध्ये आशुतोष राणा चौरंगी भूमिकेत दिसणार आहेत. आशुतोष राणा साकारत असलेल्या या ४ रोल्सची सध्या चर्चा रंगते आहे.

मनोरंजनाने परिपूर्ण ‘मसाला’ मुव्ही

बॉलीवूडमध्ये ‘मसाला’ सिनेमाचा खूप मोठा इतिहास आहे. पूर्वीच्या काळी प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करण्यासाठी असे ‘मसाला’ पठडीतले सिनेमे वारंवार बनवले जायचे. आजच्या काळात आशयप्रधान सिनेमांना चांगले दिवस आले असले तरी काही सिनेमांमध्ये मसाला तडका पाहायला मिळतो.  ‘ये कैसा तिगडम’ हा सिनेमाही याच पठडीतला आहे. ये कैसा तिगडम या सिनेमात आशुतोष राणा चौरंगी भूमिका साकरत असल्यामुळे, त्यांचे चाहते या सिनेमासाठी नक्कीच उत्सुक असणार. नुकतंच या सिनेमाचं म्युझिक लाँच करण्यात आलं. ‘ये कैसा तिगडम’च्या ट्रेलरलाही सोशल मीडियावर पसंती मिळते आहे.

सिनेमाची कथा थोडक्यात…

नईम-एजाज यांनी या सिनेमाची कथा लिहीली असून, इस्माईल दरबार यांनी त्याचं दिग्दर्शन केलं आहे. आशुतोष राणा सिनेमामध्ये एकाच चेहऱ्याच्या ४ वेगवेगळ्या माणसांच्या कथा साकारणार आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहताना त्यांनी प्रत्येक कॅरेक्टरला दिलेली वेगळा रंग आपल्याला पाहायला मिळतो. आशुतोष साकारत असलेल्या पात्राचं नाव छगन पटेल असून तो हिऱ्यांचा व्यापारी असतो. छगनचं लग्न झालेलं असूनही तो शरीर सुखाच्या शोधात असतो. याशिवाय आशुतोष राणानी सलीम आणि कलीम या दोन भावंडांच्या व्यक्तिरेखाही साकारल्या आहेत. हे दोघं भाऊ लग्नासाठी मुलगी शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांची चवथी व्यक्तिरेखा आहे बारुद भाईची. हे चौघंही योगायोगाने एकाच मुलीच्या प्रेमात पडतात. त्यामुळे मग उडणारा गोंधळ, निर्माण होणारे गैरसमज, अॅक्शन, इमोशनल ड्रामा या सगळ्याची गोष्ट म्हणजे ‘ये कैसा तिगडम’ हा सिनेमा.

पाहा सिनेमाचा ट्रेलर :