घरमनोरंजनबर्थडे बॉय आयुष्मान खुराणा एकेकाळी ट्रेनमध्ये गाणे गात असे!

बर्थडे बॉय आयुष्मान खुराणा एकेकाळी ट्रेनमध्ये गाणे गात असे!

Subscribe

आयुष्मान एके काळी ट्रेन मध्ये गाणे गात असे. विशेष म्हणजे त्याचे गाणे ऐकून प्रवासी त्याला पैसे सुद्धा देत.

बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराणा आज ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे सकाळपासूनच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कालच त्याचा ‘ड्रीम गर्ल’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्याचा आनंद नक्कीच द्विगुणीत झाला असणार. २०१२ साली विकी डोनर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर आयुष्मानने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पण आयुष्मान एके काळी ट्रेन मध्ये गाणे गात असे. विशेष म्हणजे त्याचे गाणे ऐकून प्रवासी त्याला पैसे सुद्धा देत.

- Advertisement -

पैशातून गोव्याची सहल

‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका शोमध्ये गेला असता खुद्द आयुष्मानने याबाबत सांगितले आहे. त्याने आपल्या महाविद्यालयीन दिवसांतील आठवण सांगितली. तो म्हणाला की, “महाविद्यालयीन दिवसात मी ट्रेनमध्ये गाणे म्हणायचो. चंडीगढ इंटरसिटी ट्रेनच्या सेकंड क्लास डब्यातून मी माझ्या मित्रांसोबत प्रवास करायचो. प्रवासादरम्यान आम्ही गाणी गात. बऱ्याच वेळा माझ्या आवाजाने प्रभावित होऊन सहप्रवासी मला पैसे देत. एके दिवशी आम्ही एका दिवसात चक्क १००० रुपये कमवले होते. तेव्हा अशाप्रकारे जमलेल्या पैशांमधून मी माझ्या मित्रांसोबत गोव्याच्या सहलीला गेल्याचेही त्याने सांगितले.

- Advertisement -

‘ड्रीम गर्ल’ दमदार एन्ट्री

बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आयुष्मानने रेडियो जॉकी, वीजे म्हणून काम केले आहे. त्याने काही कार्यक्रमसुद्धा होस्ट केले आहेत. कालच त्याचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी चित्रपटाने १०.०५ कोटीची दमदार कमाई केली आहे.

हेही वाचा – ‘या’ चित्रपटासाठी ‘गर्ल्स’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -