दिग्दर्शक अब्बास – मस्तानचा पुन्हा एकदा नवा थ्रिलर

दिग्दर्शक अब्बास मस्तान २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या कोरियन चित्रपट 'टनल'चा हिंदी रिमेक बनवणार आहेत. मिळालेल्या बातमीनुसार, ही जोडी या चित्रपटासाठी कोणत्या तरी मोठ्या स्टारला साईन करणार आहेत.

Mumbai
अब्बास - मस्तान

हिंदी चित्रपटांमध्ये सस्पेन्स थ्रिलरचा तडका लावणाऱ्या दिग्दर्शकाची जोडी अब्बास – मस्तान पुन्हा एकदा परत येत आहे. लवकरच ही जोडी कोरियन सस्पेन्स ड्रामा ‘टनल’चा रिमेक घेऊन येत आहे. अब्बास – मस्तान आपल्या सस्पेन्स थ्रिरल चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. आतापर्यंत ‘बाजीगर’, ‘रेस’, ‘रेस २’, ‘अजनबी’ आणि ‘ऐतराज’ अशा चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

कोरियन चित्रपट ‘टनल’ चा रिमेक

दिग्दर्शक अब्बास मस्तान २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या कोरियन चित्रपट ‘टनल’चा हिंदी रिमेक बनवणार आहेत. मिळालेल्या बातमीनुसार, ही जोडी या चित्रपटासाठी कोणत्या तरी मोठ्या स्टारला साईन करणार आहेत. तसंच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला याच वर्षाच्या शेवटी सुरुवात करण्याचीदेखील या दोघांची योजना असल्याचं समजत आहे. चित्रपटातील प्रमुख भूमिका कोण करणार? आणि चित्रपटाच्या चित्रीकरणाचं शेड्युल फायनल झाल्यानंतर याबद्दल घोषणा करण्यात येणार असल्याची बातमी ‘डीएनए’ या वृत्तपत्रानं दिली आहे. दरम्यान ‘टनल’ची कथा ही आपल्या मुलीसाठी बर्थडे केक आणायला गेलेले वडील कशा प्रकारे येताना टनलमध्ये फसतात याभोवती गुंफलेली आहे. अब्बास आणि मस्तान ही कथा आता कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर आणतात याचीही उत्सुकता आता दिसून येत आहे.

‘रेस ३’ संदर्भात झाली होती चर्चा

थ्रिलर शैलीसाठी ओळखली जाणारी अब्बास मस्तान यांच्या जोडीची चर्चा मागच्या वेळी सलमान खानच्या ‘रेस ३’ चित्रपटामुळं झाली होती. मात्र रेसच्या दोन्ही भागांचं दिग्दर्शन अब्बास मस्ताननं केलं असलं तरीही तिसऱ्या भागाचं दिग्दर्शन मात्र रेमो डिसुझानं केलं होतं. मात्र पहिल्या दोन भागांप्रमाणे या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळं यावर बरीच चर्चा झाली होती.