प्रेक्षकांना भावणार अभिज्ञाचा सूर

'तुला पाहते रे' या लोकप्रिय मालिकेतील मायराची भूमिका साकारणारी अभिज्ञा भावे. लवकरच सूर सपाटा या चित्रपटातून एका वेगळ्या भुमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Mumbai
Abhidnya Bhave
अभिज्ञा भावे

अभिज्ञा भावे म्हणजेच सध्या सगळ्यांची लाडकी मायरा. ‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेतील मायराची भूमिका साकारणारी अभिज्ञा सध्या साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतेय. आपल्या अभिनयामुळे हीने अल्पावधीतच मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. भूमिका कोणतीही असो आपल्या खास शौलीने ती भुमिका आपलीशी करते. अशाच एका चॅलेंजिंग भूमिकेतून ती आपल्यासमोर येणार आहे. ‘सूर सपाटा’ या आगामी मराठी चित्रपटात अभिज्ञा महत्त्वपूर्ण भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘सूर सपाटा’ २२ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Abhidnya Bhave
अभिज्ञा भावे

‘देवयानी’, ‘लगोरी’,  ‘खुलता कळी खुलेना’, ‘कट्टी-बट्टी’, ‘तुला पाहते रे’  या मालिकांप्रमाणेच ‘सूर सपाटा’मधील तीची भूमिका काहीशी वेगळी आहे. स्त्री ही प्रत्येक घराची सपोर्ट सिस्टीम असते. मग ती आजी, आई, बायको, बहीण कुठल्याही स्वरूपात असो. संपूर्ण कुटुंब जिच्या कवेत गुण्यागोविंदानं नांदतं अशी समर्थ भूमिका अभिज्ञाच्या वाट्याला या चित्रपटाच्या निमित्ताने आली आहे.  ‘सूर सपाटा’मध्ये अभिज्ञा एका ध्येयवेड्या कबड्डीपट्टू मुलाच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. चिन्मय पटवर्धनच्या म्हणजेच ‘सूर सपाटा’मधील ‘पुरण’च्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेतील अभिज्ञा कधी प्रेमळ, प्रसंगी कठोर तर कधी भावाच्या पंखांना बळ देणाऱ्या खंबीर भूमिकेत दिसणार आहे.

या कलाकारांनी रंगणार ‘सूर सपाटा’

राष्ट्रीय पुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर, सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद तांबावडे आदींच्या प्रमुख भूमिका ‘सूर सपाटा’मध्ये आपल्याला पहायला मिळतील. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीतील तब्ब्ल २५ दिग्ग्ज कलावंत या चित्रपटात एकाचवेळेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यातील दोन महत्त्वाची नावं म्हणजे उपेंद्र लिमये आणि संजय जाधव.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here