‘माझी एक्झीट माझ्यासाठी धक्कादायक’

बिग बॉस मराठीच्या घरातून अभिजीत केळकर बाहेर पडला आहे. अभिजीतची ही अचानक एक्झीट सगळ्यांसाठीच धक्कादायक होती. घरातून बाहेर पडण्याचं नेमकं कारण अभिजीतने माय महानगरला सांगितलं आहे. त्याचबरोबर अनेक घरातील अनेक गोष्टी वाटकांबरोबर शेअर केल्या आहेत.

Mumbai

1. बिग बॉसच्या घरातील प्रवास कसा होता?
– माझ्यासाठी खूप छान प्रवास होता. आता मला ती ट्रॉफी मिळणार नाहीये याच दुख थोडं होतय. पण त्यापेक्षाही या घरात आल्याचा, टास्क खेळल्याचा जास्त आनंद मला झाला आहे. बिग बॉसचं घर हे माझं आहे असं समजूनच मी राहलो. मी ज्याप्रमाणे माझ्या घरात राहतो, जी कामं करतो अशी प्रत्येक काम मी त्या घरात केली. या घरात माझं प्रत्येकाबरोबर एक वेगळं नातं तयार झालं. मी माझा प्रत्येक टास्क झपाटल्या सारखा खेळायचो. अनेक छान क्षण मी घरात जगलो आहे. मी बाहेर पडताना म्हटलं की प्रत्येक पुढचा त्रास मला आता खेळता येणार नाहीये. जिंकायच्या एकाच ध्येयाने मी गेलो होतो. मी तिकडे कोणाला सुधारायला गेलो नव्हतो.

2. शेवटच्या आठवड्यात तू खूप अनफेअर खेळलास असं तूला वाटता का?
– अजिबातच नाही. मी या आधीचे ज्याप्रमाणे टास्क खेळलो त्याचप्रमाणे मी हा माझा टास्क पुर्ण केला. फक्त मला असं वाटतं की जे घरात पाहूणे आले होते ते सगळे पाहूण्यांसारखे खेळले. पण पुष्कर हा टास्क एक सदस्य म्हणून खेळला. त्यामुळे मी पण त्याच्याशी इतर सदस्यांसारखाच वागलो. बाकी मी नेहमी ज्या पध्दतीने माझे टास्क पुर्म करतो त्याच पध्दतीने मी हा टास्क पुर्ण केला. पण उगाचच अनफेअर खेळलो असं वाटलं. मी बिग बॉसने टास्क बुकमध्ये दिल्याप्रमाणेच वागलो. या सगळ्यात पुष्कर फेअर खेळला नाही. त्यामुळे मी अनफेअर खेळलो असं दिसतय. मी जर अनफेअर असेन तर बाकी सगळे अनफेअर खेळले अस मी म्हणेन.

3. घरातले सगळे सदस्य तुला टॉप ५ मध्ये बघत होते, अशी अचानक एक्झीट घेतलीस?
– मी ही स्वत:ला टॉप २मध्ये बघत होतो. टॉफी मिळवण्याच्या दृष्टीने मी खेळत होते. पण काही गोष्टी नशीबावर अवलंबून असतात. मी टास्क खेळण्यात कमी पडलो नाही. मला असं वाटतं मी या आधी कधीच नॉमिनेशन मध्ये आलो नाही. त्यामुळे मला माझ्या फॅन्सचा पाठिंबा आहे की नाही हे समजलं नाही. एखादा सदस्य नॉमिनेशनमध्ये आल्यावर फॅन्स त्याला वाचवण्यासाठी जे करतात. त्याचा अनुभवच कधी मी घेतला नाही. त्यामुळे अनेक अंदाज चुकले. मला वाटतं विकेंडच्या डावाला जी कारण दिली गेली ती नक्कीच पटणारी नाहीयेत.

४. तुला या पर्वादरम्यान खूप ट्रोल केलं गेलं?
– मला ट्रोल केल्यामुळे माझ्या बायकोला जास्त वाईट वाटलं. केळकर मावशी, केलकर काकू, नाचा अश्या अनेक नावांनी मला बोललं गेलं. पण मला सगळ्यांना सांगयच आहे. एखादा पुरूष रडतो म्हणजे तो कमकूवत आहे असं नाही. रडूबाई हे म्हणणं चुकीच आहे. मला व्यक्त व्हायला आवडतं. मला हसावं वाटत, रडावंस वाटल तर मी ते करणार. मला ट्रोल करण्यांकडे मी कधीच लक्ष देत नाही पण माझ्या घरच्यांना या सगळ्याचा खूप त्रास झाला.

५.पुढचे प्लॅन काय आहेत?
– माझं बंद पडलेलं नाटक लवकरात लवकर सुरू व्हावं अशी माझी आता इच्छा आहे. लवकरच दहीहंडी,गणपती येत आहेत. त्यामुळे खूप मज्जा करणार आहे. घरच्याना जास्तीत जास्त वेळ आता देणार आहे. नवीन चित्रपटाच्या, मालिकांच्या ऑफर्सची वाट बघतोय. आता घरातून बाहेर आल्यावर कामावर लक्ष केंद्रीत करेन.

घरातून बाहेर आल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांवर भडकला अभिजीत केळकर

घरातून बाहेर आल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांवर भडकला अभिजीत केळकर

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 12, 2019