‘या’ कारणांमुळे अभिजीत बिग बॉसच्या घरातून बाहेर?

Mumbai

बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात अभिजीत केळकर एलिमिनेट झाला. महेश मांजरेकर यांनी किशोरी शहाणे आणि अभिजीत केळकर या दोघांपैकी किशोरी सुरक्षित असून अभिजीत घराबाहेर पडणार असल्याचे घोषित केले. आणि घरातील सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण घरातील सदस्यही त्याला टॉप २मध्ये बघत होते.

बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडताना त्याने खास शिवसाठी गाणे म्हटले. महेश मांजरेकरांनाही अभिजीत बाहेर पडल्याचं वाईट वाटलं, अभिजीत बाहेर आल्यावर म्हणाले “मी तुला टॉप ५ मध्ये पहिले होते, पण घरामध्ये मतं मांडणारा आणि त्या मतावर ठाम राहणारा सदस्य बाहेर गेला” असे मी म्हणेन. बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडल्यावर अभिजीत केळकरला त्याच्या आतापर्यंच्या प्रवासाची सुंदर एव्ही दाखविण्यात आली. ही एव्ही बघताना सगळ्यांचेच डोळे पाणावले.

बिग बॉस मराठी सिझन २ चा या आठवड्यातील वीकेण्डचा डाव विशेष होता आणि सदस्यांना सरप्राईझ देखील मिळाले कारण मंचावर एंट्री झाली बॉलीवूडचा भाईजान आणि आपल्या सगळ्यांचा लाडका सलमान खानची. यामुळे मंचावर एक वेगळाच उत्साह संचारला होता. महेश मांजरेकर यांनी सलमान खानचे स्वागत केले आणि मंचावर गप्पा रंगल्या. यावेळी सलमानने अनेक किस्से सांगितले. घरात झालेली चोरी, वडिलांचा पगार जाळणे असे गमतीशीर गोष्टी सांगितल्या. घरातीलसदस्यांशी देखील सलमानने बर्‍याच गप्पा मारल्या, त्यांना सल्ला दिला आणि खूप मजा मस्तीही केली. सगळ्यांसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला.

या कारणामुळे अभिजीत घराबाहेर?
अभिजीत केळकर याच्या घरातून बाहेर जाण्यामुळे सगळेच नाराज झाले. पण अभिजीत घराबाहेर पडण्यामागे गेला आठवड्यातील अभिजीतचे वागणे कारणीभूत ठरले. गेला संपूर्ण आठवडा अभिजीत प्रामाणिकपणे वागला नाही. खांबाच्या टास्कमध्ये त्याने शिवची चुकीची बाजू घेतली. त्याने हिरा लपवण्याच्या टास्कमध्ये देखील अभिजीत कोणत्याच फेरीत नीट खेळला नाही. या त्याच्या वागण्यामुळे अभिजीतला घरातून बाहेर पडावे लागले.