अभिनय बेर्डेची आता नवी ‘आशिकी’

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे देखील अभिनयाच्या क्षेत्रात आला आहे. ‘ती सध्या काय करते’ या सुपरहिट सिनेमातून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केले. आपल्या पहिल्याच सिनेमातून अभिनयने तमाम मराठी प्रेक्षकांचे आणि विशेषत:तरूण मुलींचे मन जिंकून घेतले. अभिनयच्या फिमेल फॅन्ससाठी आता एक खुशखबर आहे. लवकरच अभिनयचा नवीन सिनेमा येतोय. विशेष म्हणजे अभिनय या सिनेमामध्ये रोमान्स करताना दिसणार आहे.

‘या’ सुंदर मुलीसोबत अभिनय करणार रोमान्स

अभिनयच्या नव्या सिनेमाचे नाव आहे ‘अशी ही आशिकी’. यूथ लव्ह स्टोरी असलेल्या या सिनेमात अभिनयसोबत हिरोईन म्हणून हेमल इंगळे ही तरुणी झळकणार आहे. हेमल इंगळेचा हा पहिलाच सिनेमा आहे. उपलब्ध माहितीनुसार, सिनेमात अभिनय आणि हेमलचा रोमान्स पाहायला मिळणार आहे.

सौजन्य – हेमल इंगळे/ फेसबुक
शूटिंग झाले सुरु…

अभिनेते-निर्माते सचिन पिळगांवकर यांनी या सिनेमाची निर्मीती केली आहे. मागील वर्षी १५ ऑगस्ट रोजी सचिन यांनी एका नव्या मराठी सिनेमाची घोषणा केली होती. ‘अशी ही आशिकी’ हा बहुधा तोच सिनेमा असवा. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असल्याचे समजते आहे. अभिनेते जयवंत वाडकर यांचीही या सिनेमात महत्त्वाची भूमिका असणार आहे. दरम्यान हेमलने तिच्या फेसबुक अकाउंटवरुन सेटवरील काही फोटो शेअऱ केले आहेत.

सौजन्य – हेमल इंगळे/ फेसबुक

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here