घरमनोरंजनअभिषेकची 'पा'साठी भावूक पोस्ट!

अभिषेकची ‘पा’साठी भावूक पोस्ट!

Subscribe

प्रोजरिया नावाच्या एका दुर्लभ अनुवांशिक आजाराने ग्रस्त असलेल्या १२ वर्षीय ऑरो या मुलाच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे.

दिग्दर्शक आर. बाल्की दिग्दर्शित ‘पा’ चित्रपटाला १० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने अभिनेता अभिषेक बच्चनने इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट लिहिली आहे. प्रोजरिया नावाच्या एका दुर्लभ अनुवांशिक आजाराने ग्रस्त असलेल्या १२ वर्षीय ऑरो या मुलाच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी ऑरो हे पात्र साकारले आहे. तर अभिनेत्री विद्या बालन हीने आरोची आई तर अभिषेक बच्चन याने आरोच्या वडीलांची भूमिका साकारली आहे. दरम्यान सध्या बिग बी अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत.

हेही वाचा – ‘या’ चित्रपटातून मानुषी छिल्लर करणार बॉलीवूड पदार्पण

अभिषेकची इन्स्टाग्राम पोस्ट

‘पा’ चित्रपटाला दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने अभिषेक बच्चनने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहे. त्याने लिहिले की, ‘माझा प्रोड्यूसर म्हणून हा पहिलाच चित्रपट होता. दूरदर्शी आर. बाल्की यांच्या विश्वासाशिवाय चित्रपट पूर्ण करणं अशक्य होतं. अनेक लोकांना हे माहीत नाही की, मला या चित्रपटात काम करायचं नव्हतं. (कारण मी माझ्या भूमिकेबाबत साशंक होतो.) बाल्की आणि मी एकत्र जाहिरातीचं शुटिंग करत होतो. त्यावेळी त्यांनी संपूर्ण दिवस माझी समजूत काढण्यात घालवला.’

View this post on Instagram

PAA!! 10 years already. This 1st film I produced. It would not have been possible without the conviction of this mad visionary called R. Balki! Not many know, I didn't want to act in the film ( wasn't convinced about my role) Balki and I were shooting an ad together and he spent the day convincing me. After hours of badgering, in an attempt to just get him to stop – I said yes! It turned out to be such a fun and memorable experience. I'm so glad he had the tenacity and belief in my capabilities to relentlessly pursue me. His conviction in me and his ability to steer me through this journey is something I will never be able to repay him for or thank him enough for. I'm so proud of this film! It would not have been possible to produce this one without the immense help, guidance, support and belief of Wing Commander Ramesh Pulapaka ( our CEO) Sunil Manchanda ( my producing partner and the main man) and Reliance Entertainment. They were all the back bone of this film. The amazing crew. Starting with the great PC sir and Raja sir. Anil Naidu, Sunil Babu, our amazing make-up team, the amazing AD's, Hitendra Ghosh, the costume team and the rest of the unit. To my Auro. My PAA. For having faith in his son to firstly play his father and then allow him to produce an Amitabh Bachchan film!!! To Vidya, Arundhathi ji, Paresh ji and the rest of the cast for being flawless and so supportive. I owe you all so much gratitude ( coz I'm sure I signed all your checks ??). And lastly to the audience for seeing the film and making it such a success. Forever indebted. #10yearsofPaa

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

- Advertisement -

अभिषेक पुढे बोलताना म्हणाला की, ‘तासन्तास त्यांनी माझी समजूत काढली. त्यानंतर त्यांना शांत करण्यासाठी मी हो म्हणालो. पण हा अनुभव मजेशीर आणि आठवणीत राहील असाच होता. मला या गोष्टीचा आनंद आहे की, त्यांनी या प्रवासात मला जे काही मार्गदर्शन केलं त्याची परतफेड मी कधीच करू शकणार नाही. आणि त्यांना धन्यवाद सुद्धा देऊ शकणार नाही. मला या चित्रपटावर फार गर्व आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -