घरमनोरंजनअमेय 'ही'च्यासाठी शोधत होता नावं

अमेय ‘ही’च्यासाठी शोधत होता नावं

Subscribe

मुरांबा, फास्टर फेणे मधून सगळ्यांच लक्ष ज्याने वेधून घेतलं तो अभिनेता म्हणजे अमेय वाघ. त्यानंतर आलेल्या ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकातील आपल्या अभिनयाने आपलं वेगळं स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलं. अमेय वाघ सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. तो चर्चेत असण्यामागचं कारण म्हणजे अमेयची फेसबुक पोस्ट. गेल्या काही दिवसांपासून अमेय फेसबुक पोस्टद्वारे चाहत्यांकडून मदत मागतली होती. चाहत्यांनी त्याच्या पोस्टला भरभरून दादही दिली. आज या मागचं नेमकं कारण समोर आलं आहे.

 

View this post on Instagram

 

जरा मदत हवीये तुमची! मुलीसाठी नाव सुचवा प्लीज!

A post shared by amey wagh (@ameyzone) on

अमेय ने एक फोटो फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘जरा मदत हवीये तुमची, मुलीसाठी नाव सुचवा प्लीज,’असं कॅप्शन या पोस्टला दिलं आहे. अमेयच्या या पोस्टवर भरभरून लाइक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहेत. प्रिया बापट, निपुण धर्माधिकारी,इशा केसकर,मिथीला पालकर यांनीसुद्धा मुलींसाठी नावं सुचवली आहेत. अमेयच्या घरात कोणताही नवा पाहुणा येणार नसून त्याचा आगामी ‘गर्लफ्रेंड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -

अमेयच्या पोस्ट मध्ये आहे तरी काय?

प्रत्येक तरुण आयुष्यामध्ये एकदातरी प्रेमात पडतो. त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये एखादी गर्लफ्रेंड असणं साहाजिकचं आहे. मात्र जे तरुण गर्लफ्रेंडच्या शोधात आहेत त्यांचं काय ? त्यामुळे सध्या अमेय नचिकेत प्रधानसाठी मुलींची नाव शोधतांना दिसत आहे. अमेय लवकरच ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटामध्ये झळकणार असून या चित्रपटामध्ये तो नचिकेत प्रधान ही भूमिका साकारत आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन उपेंद्र सिंधये यांनी केलं आहे. तर चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी ही त्यांनी सांभाळली आहे. तर चित्रपटाची निर्मिती अनिश जोग, रणजित गुगळे, अमेय पाटीस, कौस्तुभ धामणे, अफीफा सुलेमान नाडियादवाला करणार आहे.

- Advertisement -

 अमेयची गर्लफ्रेंडच्या रूपात दिसणार ही अभिनेत्री

अमेय ने आज पोस्ट करत तो लवकरच ‘गर्लफ्रेंड’या चित्रपटात दिसणार असल्याचं जाहीर केलं. यावेळी ती गर्लफ्रेंड कोण असणार आहे हे त्या पोस्टमध्ये दिसत नाहीये. पण ही पोस्ट इशा केसकरने शेअर केली आहे. त्यामुळे अमेयच्या त्या गर्लफ्रेंडच्या भुमिकेत इशा दिसण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -