Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अखेर करणवीरचे 'दिल्ली ते काठमांडू' विमान उडाले भूरर...

अखेर करणवीरचे ‘दिल्ली ते काठमांडू’ विमान उडाले भूरर…

अभिनेता करणवीर बोहरा हा अखेर नेपाळला पोहचले असल्याचे त्याने आपल्या ट्विटरच्या माध्यमातुन सांगितले आहे. करणवीर दिल्ली ते काटमांडू येथे जात असताना दिल्ली विमानतळावर त्याला अडविण्यात आले होते.

Related Story

- Advertisement -

अभिनेता करणवीर बोहरा हा अखेर नेपाळला पोहचला असल्याचे त्याने आपल्या ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. करणवीर दिल्ली ते काठमांडू येथे जात असताना दिल्ली विमानतळावर त्याला अडविण्यात आले होते. मात्र आपण नेपाळला पोहचल्याचे त्याने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.

करणवीरला का अडविण्यात आले?

- Advertisement -

अभिनेता करणवीर आपली आगामी वेबसीरीज कॅसिनोच्या चित्रीकरणाकरिता नेपाळला जात असताना त्याला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडविण्यात आले होते. दिल्ली ते काठमांडू त्याचे विमान होते. मात्र प्रवासाकरिता आवश्यक कागदपत्रे नसल्याने त्याला अडविण्यात आले. “माझ्याकडे आधारकार्ड होते, पण पासपोर्ट नव्हता, असे असताना ‘मी मुंबई ते दिल्ली विमानाने प्रवास केल्यावर मला अडविण्यात आले नाही. पण दिल्ली विमानतळावर मात्र अडविण्यात आले. असे का करण्यात आले?” हा प्रश्न त्याने विचारला होता, मात्र त्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी प्रवासासाठी जाताना आधी नियम तपासून पाहत जा असा सल्ला दिला.

करणवीरणे नंतर आपल्याकडे त्यावेळी योग्य कागदपत्रे नसल्याचे त्याने मान्य केले, मात्र विमानतळावरील अधिकाऱ्यांची देखील यात चूकी असल्याचे त्याने सांगितले. ‘मला आधीच जर मुंबई विमानतळावर अडविले असते तर हा त्रास झाला नसता’ असं तो म्हणाला आहे.

- Advertisement -

 

नेपाळला कसा पोहचला करणवीर

दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला रोखण्यात आले असताना मुंबईहून त्याने आपला पासपोर्ट मागविला त्यानंतर तो दिल्लीहून नेपाळ करीता रवाना झाला. नेपाळला पोहचल्यावर त्याने या संदर्भात माहिती दिली आहे. करणवीर हा त्याची आगामी वेबसीरीज कॅसिनोच्या चित्रीकरणासाठी नेपाळला गेला आहे.

- Advertisement -