Monday, August 10, 2020
Mumbai
28 C
घर मनोरंजन निलेश साबळे यांच्यासाठी खूप आदर आहे – मिहीर राजदा

निलेश साबळे यांच्यासाठी खूप आदर आहे – मिहीर राजदा

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेद्वारे आनंद हि व्यक्तिरेखा घराघरात पोहोचली आणि अभिनेता मिहीर राजद याला अफाट लोकप्रियता मिळाली. आता प्रेक्षक मिहीरला एका वेगळ्या भूमिकेत पाहू शकणार आहेत. चला हवा येऊ द्या शेलिब्रिटी पॅटर्नमध्ये मिहीर कॉमेडी करणार आहे. त्यानिमित्ताने तिच्यासोबत साधलेला हा खास संवाद

Mumbai

१. चला हवा येऊ द्या मध्ये कॉमेडी करणार हे कळल्यावर तुला प्रेक्षकांकडून काय प्रतिक्रिया मिळाल्या?

– मला खूप सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. चला हवा येऊ द्या शेलिब्रिटी पॅटर्न मध्ये माझा पहिला परफॉर्मन्स झाल्यानंतर मला बऱ्याचजणांचे मेसेजेस आले. जे लोक मला आनंद म्हणून ओळखतात ते लोक मला आज माझ्या चला हवा येऊ द्या मधील पहिल्या परफॉर्मन्स नंतर मी साकारलेला हवालदार मामा देखील त्यांना आवडला हे आवर्जून सांगतात. थुकरट वाडीतील विनोदवीरांनी प्रेक्षकांच्या विनोदाबद्दलच्या अपेक्षा खूपच वाढवल्या आहेत. त्यामुळे या पर्वाचा हिस्सा झाल्यावर माझ्या पहिल्याच परफॉर्मन्सच्या वेळी मी खूप नर्वस होतो. डॉक्टर निलेश साबळे यांनी मला कष्टाचं फळ हापूस म्हणजेच १० पैकी १० गुण दिले. मला नाही माहिती मी इतके गुण मिळण्यासाठी पात्र आहे कि नाही हे देखील मला नाही माहिती, पण मी माझा परफॉर्मन्स मी खूप एन्जॉय केला.

२. कॉमेडी करणं तुझ्यासाठी किती आव्हानात्मक आहे?

– कॉमेडी करणं खूपच आव्हानात्मक आहे कारण हे अवास्तविक आहे. तसंच शेलिब्रिटी पॅटर्न हि एक स्पर्धा आहे आणि थुकरट वाडीतील विनोदवीरांनी विनोदाचा एक अनोखा पायंडा पाडला आहे त्यामुळे त्यांच्या तोडीस तोड कॉमेडी करणं खूपच आव्हानात्मक आहे.

३. तू ‘साताऱ्याचे शिलेदार’ या सागरच्या टीमचा सदस्य आहेस, कॉमेडीचे धडे गिरवण्यासाठी सागरची कितपत मदत होते?

– सागरने मला स्पर्धेचा विचार न करता परफॉर्मन्स एन्जॉय करायला सांगितलं आहे. त्याला माझा प्रामाणिक दृष्टीकोन आवडतो.

४. थुकरटवाडीतील तुझा फेव्हरेट विनोदवीर कोण आणि का?

– मला सगळेच खूप आवडतात. ते सगळेच खूप टॅलेंटेड आहेत, कोणा एकाची निवड करणं खूप कठीण आहे. पण मला कॅप्टन ऑफ द शिप डॉक्टर निलेश साबळे यांच्यासाठी खूप आदर आहे. जितकं दिसतं तितकं हे सोपं नाही आहे पण डॉक्टर सगळं खूप सहजपणे हाताळतात.

५. शेलिब्रिटी पॅटर्नमध्ये तुला टक्कर देणारा कलाकार कोण वाटतं?

– मी सगळ्या स्पर्धकांना अजून नीटपणे ओळखत नाही. तसंच सध्या मी स्वतःवर जास्त फोकस करत आहे. अद्वैत दादरकर सोबत मी काम केलं आहे आणि तो माझा खूप चांगला मित्र आहे त्यामुळे एक गोष्ट मला नक्कीच माहिती आहे कि अद्वैत वाखाणण्याजोगं काम करेल.