घरताज्या घडामोडीपार्थ पहिल्यांदाच झळकणार मराठी टेलिव्हिजनवर

पार्थ पहिल्यांदाच झळकणार मराठी टेलिव्हिजनवर

Subscribe

‘झी मराठी’, ‘झी युवा’ आणि ‘झी टॉकीज’नंतर आता ‘झी वाजवा’ ही नवीन सांगीतिक वाहिनी झी समूह १७ ऑक्टोबर पासून सादर करणार आहे. ही वाहिनी प्रेक्षकांना डॉल्बी आवाजात ३००० पेक्षा जास्त गाणी आणि प्रेक्षकांना केंद्रासाठी ठेवून केलेले अनोखे कार्यक्रम सादर करणार आहे जे याआधी प्रेक्षकांनी दुसऱ्या कुठल्याच सांगीतिक वाहिनीवर पाहिले नसतील. गाण्यांसोबतच ही वाहिनी आठवड्याचा शेवटी एक अनोखा विनोदी कार्यक्रम देखील प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे. या कार्यक्रमाचे नाव आहे ‘भावड्याची चावडी’. याच कार्यक्रमातून पार्थ भालेराव पहिल्यांदाच मराठी टेलिव्हिजनवर झळकणार आहे.

- Advertisement -

या चावडीच्या माहोल मराठी तरुणाई रिलेट करू शकते. कारण त्यांच्या खऱ्या आयुष्यात देखील ते आपल्या मित्र मैत्रिणींना जवळच्या कट्ट्यावर भेटून वेळ घालवतात, हाच माहोल ‘झी वाजवा’ टेलिव्हिजनवर या कार्यक्रमातून सादर करणार आहे. या कार्यक्रमाची कथा भावड्या या कुठल्याही सामान्य मुला सारख्या असलेल्या मुलाभोवती फिरते. हा एक तरुण मुलगा आहे ज्याला असे वाटत की त्याच्याकडे खूप टॅलेंट आहे. पण त्याला नक्की आयुष्यात पुढे काय करायचंय हे त्याला अजून कळले नाही आहे. याच गोष्टीवर चर्चा करत भावड्या आणि त्याचे अजून २ मित्र त्याच्यासोबत चावडीवर वेळ घालवतात. त्यांच्या या चर्चेत ते अनेक कलाकारांना देखील आमंत्रित करून वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांची मतं जाणून घेतात. या कार्यक्रमातील भावड्या हा दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता पार्थ भालेराव आहे. या कार्यक्रमात अवधूत गुप्ते, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर आणि इतर अनेक कलाकार सिलेब्रिटी गेस्ट म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येतील.

- Advertisement -

आपल्या टेलिव्हिजन पदार्पणाबद्दल उत्सुकता व्यक्त करताना पार्थ भालेराव म्हणाला, ‘मी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ‘झी वाजवा’ या वाहिनीद्वारे पुन्हा एकदा हजर होतोय आणि येवेळी टेलिव्हिजन या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय यासाठी मी खूप उत्सुक आहे. ‘भावड्याची चावडी’ या कार्यक्रमात मी अगदी वेगळ्या अवतारात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. दुप्पट मजा, भरपूर मनोरंजन आणि आम्ही कलाकारांसोबत केलेला वेडेपणा या कार्यक्रमातून प्रेक्षक अनुभवू शकतील. या कार्यक्रमाच्या थीमसोबत सर्व प्रेक्षक रिलेट करू शकतील आणि म्हणूनच हा कार्यक्रम प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवेल अशी मला खात्री आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -