घरताज्या घडामोडी'बडे अच्छे लगते है' फेम अभिनेता राम कपूर यांच्या आईवर गुन्हा दाखल

‘बडे अच्छे लगते है’ फेम अभिनेता राम कपूर यांच्या आईवर गुन्हा दाखल

Subscribe

‘बडे अच्छे लगते है’ फेम अभिनेता राम कपूर यांची आई रिटा कपूर यांच्या पाळीव कुत्र्याने शेजाऱ्यांच्या मुलीचा चावा घेतल्या प्रकरणी रिटा कपूर यांच्याविरुद्ध मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मलबार हिल पोलिसांनी रिटा कपूर यांचा जबाब नोंदवून घेतला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. डी पाटील यांनी दिली.

हिंदी टीव्ही मालिका तसेच चित्रपटात काम करणारे अभिनेते राम कपूर यांची आई रिटा कपूर दक्षिण मुंबईतील केम्स कॉर्नर येथील एका सोसायटी मधील रो होऊनमध्ये राहण्यास आहेत. रिटा कपूर यांनी जर्मन शेफर्ड जातीचा श्वान पाळला आहे. २३ जून रोजी रिटा कपूर या आपल्या श्वानाला घेऊन सोसायटीच्या आवारात फिरत होत्या. त्या वेळी सोसायटीतील काही मुले त्या ठिकाणी खेळत असताना रिटा कपूर यांचा श्वान खेळणाऱ्या मुलांच्या अंगावर धावून गेला आणि ५ वर्षांची मुलगी मायरा हिच्या डाव्या पायाला चावला. मुलीचा आरडाओरड ऐकून रिटा कपूर यांचा नोकर धावतच आला आणि त्याने श्वानापासून मायराची सुटका केली.

- Advertisement -

जखमी मायराला तिच्या पालकांनी ताबडतोब उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करुन तिच्यावर उपचार करण्यात आले. याप्रकरणी मायराचे वडील विवेक रेशमवाला यांनी रिटा कपूर यांच्याविरुद्ध मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी रिटा कपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पुढील तपास सुरू असल्याची माहिती मलबार हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. डी पाटील यांनी आपलं महानगरला दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -