घरमनोरंजनVideo: शाहिद कपूर घेतोय 'जर्सी'साठी जीवतोडून मेहनत

Video: शाहिद कपूर घेतोय ‘जर्सी’साठी जीवतोडून मेहनत

Subscribe

चित्रपटातील आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी क्रिकेटची जोरदार प्रॅक्टिस

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आपल्या तेलगू चित्रपट जर्सीच्या हिंदी रिमेकसाठी खूप मेहनत करत आहे. शाहिदने या चित्रपटातील आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी क्रिकेटचे कोचिंगही सुरू केले आहे. या चित्रपटात शाहिद एका क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहिद कपूरने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. इंन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो क्रिकेट खेळताना दिसतोय.

सोशल मीडियावर शाहिदचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो क्रिकेटचा सराव करताना जोरदार छक्के-चौके मारताना दिसत आहे. जर्सीसाठी शाहिद घेत असलेल्या जीवतोड मेहनतीसाठी चाहते त्यांचे कौतुक करत आहे. या व्हिडिओवर नेटकरी तसेच चाहते आपल्या प्रतिसाद देताना दिसत आहे.

View this post on Instagram

#jersey #prep

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

- Advertisement -

शाहिद कपूर सोशल मीडियावर चाहत्यांसाठी अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. कबीर सिंग चित्रपटासाठी शाहिदने अशीच जीवतोड मेहनत केली होती. कबीर सिंगच्या यशाने प्रेरित होऊन तेलगू चित्रपटाच्या हिंदी रिमेक असलेल्या जर्सी चित्रपटासाठी तशीच मेहनत घेत आहे.

- Advertisement -

सुपर ३० आणि बाटला हाऊस या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केल्यानंतर आता अभिनेत्री मृणाल ठाकूर आता शाहिद कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. जर्सी हा चित्रपट तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. ओरिजनल जर्सी चित्रपटाचे गौतम तिन्नानुरी हे दिग्दर्शक असून या रिमेकचे दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. मृणाल ठाकूर आणि शाहिद कपूर ही बॉलिवूडमधील जोडी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहे.  अल्लू अरविंद, अमन गिल आणि दिल राजूद्वारा निर्मित असणारा हा चित्रपट २८ ऑगस्ट २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

#jersey the prep begins.

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on


जर्सीमध्ये शाहिद कपूरसोबत ‘ही’ अभिनेत्री दिसणार रोमान्स करताना
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -