घरमनोरंजनसुबोध भावे 'या' अभिनेत्रीसह छोट्या पडद्यावर झळकणार

सुबोध भावे ‘या’ अभिनेत्रीसह छोट्या पडद्यावर झळकणार

Subscribe

अभिनेता सुबोध भावेने अभिनयातून नेहमीच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.सुबोधची नवी कोरी मलिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तुला पाहते रे या मालिकेनंतर सुबोध पुन्हा एकदा मालिकेच्या छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. ‘चंद्र आहे साक्षीला’ या नव्या मालिकेत सुबोध भावे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर अनन्या फेम अभिनेत्री ‘ऋतूजा बागवे’ ही मुख्य नायिकेच्या भुमिकेत असणार आहे. मालिकेचा पहिला प्रोमो सुबोध भावेने आपल्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे.

- Advertisement -

मालिकेचा प्रोमो शेअर करत सुबोधने सौ.सुमन आणि श्रीधर काळे तुम्हाला भेटायला येत आहेत, असं म्हटलं आहे. मालिकांशी जोडलेली नाळ कधी तुटली नाही, पुन्हा एकादा नव्या रूपात तुमच्या समोर येतोय असं ही सुबोधनं म्हटलं आहे. ही नवी मालिका ११ नोव्हेंबर पासून पाहता येणार आहे. प्रथमच सुबोध आणि ऋतुजा ही जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेनंतर ऋतुजाची मोठ्या ब्रेक नंतर छोट्या पडद्यावर दमदार एट्री आहे. तसेच सुयोग निर्मित अनन्या या व्यावसायिक नाटकातून ऋतुजा दिसली होती. ऋतुजाने साकारलेली अनन्या ही रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून गेली. आता सुबोध भावेसह ऋतुजा छोट्या पडद्यावर स्क्रिन शेअर करणार आहे.

काय म्हणाले निखिल साने ?
“आज Viacom18साठी एक वर्तुळ पूर्ण होत आहे. सुरूवात झाली एका चित्रपटाने ‘आणि डॉ.काशिनाथ घाणेकर’ मग नाटक ‘अंश्रृची झाली फुले’ आणि आता नवी मालिका. या सगळ्यात महत्त्वाचा धागा म्हणजे सुबोध भावे.आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की चंद्र आहे साक्षीला या मालिकेद्वारे कलर्स मराठीवर एक दैनंदिन मालिकेच्या माध्यमातून सुबोधचं पदार्पण होत आहे. येत्या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर या नव्याकोऱ्या मालिकेचं आगमन होत आहे, असं निर्माते निखिल साने यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर सुबोधच्या या संपूर्ण प्रवासाबद्दल त्याचे आभार मानलेत त्याचप्रमाणे त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा ही दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

आज Viacom18 साठी एक वर्तुळ पूर्ण होतं आहे. सुरुवात झाली एका चित्रपटाने : ‘आणि डॅा. काशिनाथ घाणेकर’.. मग नाटक ‘अश्रुंची झाली फुले’ आणि आता नवी मालिका! या सगळ्यातील महत्वाचा, समान धागा म्हणजे सुबोध भावे! आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे की ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेद्वारे Colors मराठीवर एका दैनंदिन मालिकेच्या माध्यमातून सुबोधचं पदार्पण होत आहे. येत्या दिवाळीच्या शुभमुहुर्तावर या नव्याकोऱ्या मालिकेचं आगमन होत आहे। सुबोध.. या सर्व प्रवासासाठी तुझे मनापासून आभार आणि खूप खूप शुभेच्छा ! @colorsmarathiofficial @subodhbhave @deepakrajadhyaksha #colorsmarathi #marathi #marathimalika

A post shared by Nikhil Sane (@saneness_) on

- Advertisement -

कलर्स मराठीवर सुरू होणाऱ्या ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत नक्की काय पहायला मिळणार याबाबात प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -