सुशांतच्या वडिलांच्या ‘त्या’ प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Mumbai
sushant sigh rajput

१४ तारखेला अभिनेता सुशांत सिंह राजपूतने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. वयाच्या ३४ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. त्याच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उभे राहिले. यानंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर भाष्य केलं गेलं. आता सुशांतच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एका वेबसाईटशी बोलत असताना सुशांतच्या मृत्युनंतर या १२ दिवसांमध्ये काय काय घडलं हे त्यांनी सांगितलं.

सुशांतचे वडिल म्हणाले, अनेकांनी सुशांतला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा श्रद्धांजली वाहिली. मात्र या काळात अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि अंकिता लोखंडे या दोन अभिनेत्री सोडल्या तर अन्य कोणत्याही कलाकाराने सुशांतच्या कुटुंबीयांची चौकशी केली नाही.  एवढच काय तर सुशांतच्या अत्यंसंस्काराच्या वेळी कलाविश्वातील बरेच कलाकार आहे होते. मात्र त्यापैकी कोणीच माझ्याजवळ येऊन माझी विचारपूस केली नाही. मी तीन दिवस मुंबईत होतो. मात्र या काळात अंकिता लोखंडेव्यतिरिक्त अन्य कोणताच कलाकार आम्हाला भेटायला नाही आलं.

अंकिताबरोबरच  क्रिती सेनॉनने आमची भेट घेतली. त्यावेळी आम्ही कोणीच काहीच बोलत नव्हतो. ती फक्त बोलत होती. तिचं म्हणणं आम्ही शांतपणे ऐकत होतो. दरम्यान, सुशांतच्या वडिलांच्या या प्रतिक्रियेनंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.  सुशांतच्या अंत्यसंस्कारावेळी रिया चक्रवर्ती, श्रद्धा कपूर, वरुण धर्मा, विवेक ओबेरॉय, क्रिती सेनॉन हे कलाकार उपस्थित होते.


हेही वाचा – कोरोनाबाबत WHO ने जगाला दिली गुड न्यूज, लसीबाबत केली मोठी घोषणा!


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here