घरमनोरंजनशिव्या देण्याला आक्षेप का? - स्वरा भास्कर

शिव्या देण्याला आक्षेप का? – स्वरा भास्कर

Subscribe

अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळख असलेली स्वरा भास्कर ही कायमच सामाजिक, राजकीय विषयावर तिची मते मांडत असते. स्वरा भास्करची प्रमुख भूमिका असलेला ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चार मैत्रिणींच्या जीवनावर आधारीत असलेल्या या चित्रपटात मैत्रिणींमध्ये सहज होणारे संवाद आहेत. शिव्या आणि सेक्सची चर्चा आहे. या शिव्यांना आक्षेप घेत चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन काही संघटनांनी केले आहे. चित्रपटाला असणारा आक्षेप हा शिव्या देण्याला आहे की, महिलांनी शिव्या दिल्या या आहे? असा प्रश्न स्वरा भास्करने उपस्थित केला आहे. ‘नवभारत टाइम्स’ या हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत स्वरा भास्करने आपले म्हणणे मांडले.

दारू पिणं, शिव्या देणं ही पुरुषांची मक्तेदारी आहे का? दारू पिणं, शिवीगाळ करणं या वाईट गोष्टी नाहीत. त्यापेक्षाही कितीतरी वाईट गोष्टी आपल्या समाजात आहेत. मांसाहारावरून लोकांना मारणं किंवा जिवंत जाळणं, या सगळ्या घटना वाईटच आहेत. त्यामुळं योग्य काय आणि अयोग्य काय हे आपण आधी ठरवलं पाहिजे. – स्वरा भास्कर

‘सार्वजनिक ठिकाणी, वडिलधाऱ्या माणसांपुढे शिव्या देणे चुकीचे आहे. परंतु आपले काही नेते हमखास तसे करताना दिसतात, असे म्हणत स्वरा भास्करने सरकारवरही निशाणा साधला. ‘भाजप सरकार सत्तेत आल्यापासून आपला समाज हा बेदरकार, अस्वस्थ आणि द्वेषमूलक बनत चालला आहे. वेगळे विचार मांडणाऱ्यांचे तोंड बंद केले जात असल्याचा आरोप स्वराने आपल्या मुलाखतीत केला आहे.

- Advertisement -

 

वीरे दी वेडिंगला होणारा विरोध हा पुरुषप्रधान मानसिकतेतून होत असल्याचे स्वराचे म्हणणे आहे. बॉलिवुड मधील इतर चित्रपटात पुरूष पात्र शिव्या देताना दिसतात. त्यावर आक्षेप का नाही घेतला जात? आम्ही महिला असल्यामुळे आमच्यावर आक्षेप घेतला जात आहे का? भारतीयांना पुरुष अभिनेत्याने शिव्या दिलेल्या चालतात, दारू प्यायलेली चालते. मात्र हेच सर्व अभिनेत्री करत असेल तर ते कोणालाच पचत नाही, अशा शब्दात स्वराने आपला संताप व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -