घरमनोरंजनवरुण धवनलाही मराठी चित्रपटाची भुरळ

वरुण धवनलाही मराठी चित्रपटाची भुरळ

Subscribe

लवकरच बॉलिवूडचा अभिनेता वरुण धवन मराठी चित्रपटात दिसणार आहे. वरुणने 'लोकल-व्हाया-दादर' या मराठी चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

आता बॉलिवूडचे कलाकार मराठी चित्रपटांमध्ये दिसणं किंवा एखाद्या मराठी चित्रपटाची निर्मिती करणं हे आता नवीन राहिलं नाही. बॉलिवूडच्या कलाकारांच मराठी प्रेम आता जग जाहीर आहे. या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. तो अभिनेता म्हणजे वरूण धवन. नुकतच वरूणने ‘लोकल-व्हाया-दादर’ या मराठी सिनेमाचं पोस्टर सोशल मिडीयावर शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर करत दिग्दर्शक नितीन रोकडे आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

वरुण दिसणार का चित्रपटात?

वरुणने या चित्रपटाचं पोस्टर ट्वीटरवर शेअर केल्यामुळे या चित्रपटात वरुण दिसणार अशी चर्चा सुरू आहे. अजय देवगण, अक्षय कुमार, सलमान खान अशा बॉलिवूडच्या बड्या कलाकारांप्रमाणेच वरुण धवनची मराठी चित्रपटात एन्ट्री होणार असल्याची शक्यता आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच या चित्रपटाच्या शुटींगलाही सुरूवात होईल. मात्र चित्रपटात वरूण कोणत्या भूमिकेत असणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र वरुण या सिनेमाचं प्रमोशन करताना दिसत आहे.

निरागस प्रेमकथेचा ‘लोकल-व्हाया-दादर’

‘लोकल-व्हाया-दादर’ हा प्रेमकथेवर आधारीत चित्रपट आहे. एक निरागस प्रेमकथा या चित्रपटात बघायला मिळणार आहे. करूणावी क्रिएटरने या चित्रपटाची निर्मीती केली आहे. तर ‘तालीम’ चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन रोकडे यांनी ‘लोकल-व्हाया-दादर’ या चित्रपटाची कथा- पटकथा लिहीली आहे. या आधी कुस्तीसारखा मातीतला खेळ प्रेक्षकांपुढे आणणारे नितीन रोकडे यानिमित्ताने एका प्रेमकथा घेऊन येत आहेत. तर चित्रपटाचे संवाद सायली केदारे यांचे आहेत आणि छायाचित्रणाची जबाबदारी फारूख खान यांच्यावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -