शेतकऱ्याचा पोर साकारणार ‘दख्खनचा राजा जोतिबा’ची भूमिका

२३ ऑक्टोबर पासून संध्याकाळी ६:३० वाजता स्ट्रार प्रवाह वर प्रेक्षकांना ही मालिका पाहता येणार आहे. 

दख्खनचा राजा या नावाने जोतिबा हे दैवत ओळखले जाते. जोतिबाचा महिमा मालिकेच्या रूपातून लवकरच छोट्या पडद्यावर येणार आहे. कोठारे व्हिजनने या मालिकेची निर्मिती केली असून जोतिबाची भूमिका कोण साकारणार ही चर्चा होती. आता  सध्या या मालिकेच्या प्रोमोमधून अभिनेता विशाल निकम जोतिबाची भूमिका साकारणार असल्याचेही दिसून आलं आहे. सांगलीतल्या खानापूरमध्येच त्याने शालेय शिक्षण घेतलेल्या विशाल निकम हा शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे.

छोट्या पडद्यावर काही महिन्यांपासून पौराणिक, देवी-देवतांच्या मालिकांचा ट्रेंड जोरावर आहे. खंडोबा, गणपती बाप्पा यांच्यासह आता ज्योतिबा देवाचीही मालिका तयार होऊ लागली आहे. कोल्हापुरातल्या चित्रनगरीमध्ये या मालिकेचं चित्रिकरण सुरू आहे. या मालिकेसाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू होता. म्हणजे, जो चेहरा फार लोकांना माहीत नाही अशा चेहरा घेऊन त्यातून ज्योतिबा लोकांसमोर आणण्याचा मानस मालिकाकर्त्यांचा होता. त्याला आता यश आले आहे. विशाल निकम हा कलाकार आता ज्योतिबाच्या रुपाने आपल्याला दिसणार आहे. या भूमिकेसाठी विशालने १८ किलो वजन कमी केले आहे. तर अनेक गोष्टी शिकूनही घेतल्या आहेत. विशाल यापूर्वी काही मालिकांत आणि चित्रपटात झळकला आहे.

भूमिकेसाठी घेतली विशेष मेहनत

विशालला बॉडीबिल्डिंगची खूप आवड आहे. व्यायामाच्या आवडीतून त्याने सिक्सपॅक अॅब्जही बनवले होते. पण जेव्हा त्याची निवड जोतिबाच्या भूमिकेसाठी झाली तेव्हा त्याला एका महिन्यात १२ किलो वजन कमी करावे लागेल अशी अट घालण्यात आली. जोतिबाच्या भूमिकेसाठी ती गरज असल्याने विशालही लगेच वजन कमी करण्याच्या तयारीला लागला. विशालसाठी पुढचा टास्क होता तो घोडेस्वारीचा. जोतिबाचे वाहन घोडा असल्याने मालिकेसाठी विशालला घोडेस्वारी येणे आवश्यक होते. पण विशालने यापूर्वी कधीच घोडेस्वारी केली नव्हती. फक्त एक आठवड्यात विशालने घोडेस्वारीचे धडे गिरवले. सांगलीतल्या खानापूरमध्येच त्याने शालेय शिक्षण घेतले. कॉलेजच्या शिक्षणासाठी पुण्यात आणि नंतर जिम ट्रेनर म्हणून त्याचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू झाला.

झी मराठी वरील जय मल्हार मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. जय मल्हार मालिकेतून जेजुरीच्या खंडोबाची कथा प्रेक्षकांना पहायला मिळाली होती. जय मल्हारच्या यशानंतर ‘दख्खनचा राजा जोतिबा’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २३ ऑक्टोबर पासून संध्याकाळी ६:३० वाजता स्ट्रार प्रवाह वर प्रेक्षकांना ही मालिका पाहता येणार आहे.


खंडोबानंतर प्रेक्षकांना मिळणार दख्खनच्या ज्योतिबाचं दर्शन