अभिनेत्री अमृता खानविलकर करणार व्यवसाय

अमृता खानविलकर बॉलिवूड इंडस्ट्रीला डोळ्यांसमोर ठेवून नवीन प्लॅन्स तयार करत आहे.

Mumbai
अभिनेत्री अमृता खानविलकर

अनेक कलाकार काही ना काही नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. नवीन काही सुरु करु पाहणा-या अनेक कलाकारांपैकी एक अशी मराठमोळी अभिनेत्री आहे. जिने स्वत:च्या टॅलेंटवर बॉलिवूडमध्ये देखील एका पेक्षा एक बेस्ट परफॉर्मन्स दिले आहेत. ती अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. सध्या जिवलगा या मालिकेतून काव्या ही व्यक्तिरेखा साकारणारी अमृता खानविलकर व्यवसाय सुरू करणार असल्याची चर्चा चालू आहे. स्वतःचे नवीन टॅलेंट लोकांसमोर आणण्याकरिता अमृता प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर यांच्या सहयोगाने बॉलिवूड इंडस्ट्रीला डोळ्यांसमोर ठेवून नवीन प्लॅन्स तयार करत आहे असे सूत्रांच्या माहितीनुसार कळाले आहे.

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत १८ वर्षे अभिनेत्री अमृता खानविलकरने पूर्ण केली आहेत. मराठी सिनेमात उत्तम अभिनयानंतर हिंदी सिनेमांतही अमृताने स्वतःचे स्थान निर्माण केलं. बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या मेघना गुलजार दिग्दर्शित आणि आलिया भटची प्रमुख भूमिका असलेल्या ‘राझी’ सिनेमात अमृताने ‘मुनिरा’ची भूमिका अतिशय सुंदर पध्दतीने साकारली. त्यानंतर अमृताने मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ सिनेमात जॉन अब्राहम आणि मनोज बाजपेयी यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली. मराठीमध्ये उत्तम अभिनय केल्यावर अमृताने हिंदी सिनेमांतही काम केले आहे. ‘नटरंग’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमांतून संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम मिळवणारी अमृता आता लवकरच एका नवीन प्लॅनेटवर दिसणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमृताने अशी म्हणाली की, “टॅलेंट हे कधीही लपून राहू शकत नाही ते कधी ना कधी बाहेर आणणे आवश्यक असते. लवकरच तुम्हांला माझ्याकडून त्याविषयी जाणून घ्यायला मिळेल”, असं म्हणत तिने प्रेक्षकांना कोड्यात नक्कीच पाडले आहे. आता अमृता नवीन काय घेऊन येत आहे यासाठी देखील अनेकजण उत्सुक असणार यात शंका नाही.