…म्हणून भूमी पेडणेकर साकारते अर्थपूर्ण भूमिका

'यथार्थपूर्ण भूमिका साकारून माझ्या मनाला समाधान मिळते, तसेच मानसिक शांती देखील मिळते'

Mumbai

भूमी पेडणेकर नेहमी तिच्या चांगल्या अभिनयामुळे चर्चेत असते. भूमी तिच्या आगामी पति पत्नी और वो या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. कलाकार असलो तरी चित्रपटात ग्लॅमरस लूक किंवा ग्लॅमरस कपडे परिधान केल्याने समाधान मिळत नाही तर अर्थपूर्ण व्यक्तिरेखा साकारत मनाला समाधान मिळते, असे भूमी पेडणेकरने नुकतेच सांगितले. मात्र भूमी तिच्या आगामी पति पत्नी और वो या चित्रपटात चाहत्य़ांना तिचा ग्लॅमरस अंदाज बघायला मिळणार आहे.

भूमिका साकारताना ग्लॅमर असणे आवश्यक नाही

ग्लॅमरस भूमिका साकारून संतुष्टी मिळते का, अशा प्रश्नाला उत्तर देताना भूमीने असे सांगितले की, ”बाला तसेच सांड की आँख या चित्रपटात ज्याप्रकारच्या यथार्थपूर्ण भूमिका साकारून माझ्या मनाला समाधान मिळते, तसेच मानसिक शांती देखील मिळते. कोणत्याही चित्रपटात काम करताना ती ठराविक भूमिका साकारत असताना त्यात ग्लॅमर असणे आवश्यक नसते. तर ती भूमिका प्रेक्षकांपर्यंत किती पोहचते यावर मी जास्त लक्ष केंद्रित करते. ”

भूमीच्या चित्रपटात ग्रामीण किंवा छोट्या शहरातील मुलीची व्यक्तिरेखा साकारण्याविषयी बोलताना भूमी म्हणाली की, ” मी मुंबईत लहानाची मोठी झाली आहे आणि आतापर्यंच मी साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. त्यामुळे मला अशा भूमिका साकारताना मला खूप आनंद, समाधान वाटते. माझ्यासाठी ग्लॅमरस, शहरी आणि इंग्रजी भाषा बोलणाऱ्या मुलीची भूमिका साकारणे सोपे आहे. त्यामुळे मला अशा भूमिका साकारण्यासाठी फार कष्ट करण्याची गरज नाही.” पति पत्नी और वो हा चित्रपट दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांनी दिग्दर्शित केला असून ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.


‘या’ अभिनेत्रीचा योगा पाहून तुम्ही व्हाल थक्क; सोशल मीडियावर फोटो व्हायरल