घरमनोरंजनअभिनेत्री होण्यापूर्वी 'ती' लहान मुलांचे डायपर्स बदलायची!

अभिनेत्री होण्यापूर्वी ‘ती’ लहान मुलांचे डायपर्स बदलायची!

Subscribe

बॉलीवूडमध्ये नाव करणं हे प्रत्येक नवोदित कलाकारांचं स्वप्नं असतं. त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची सुद्धा तयारी या नवोदित कलाकारांमध्ये असते. बॉलीवूडमधील करिअरसाठी काहींनी घरदार सोडून मुंबई गाठली. तर काहींनी सुरुवातीचे दिवस मुंबईच्या रस्त्यांवरच काढले. असाच काहीसा प्रवास आहे अभिनेत्री कियारा अडवाणीचा. नुकत्याच एका मुलाखतीत कियाराने तिच्या बॉलीवूड पर्यंतच्या प्रवासाला उजाळा दिला. अभिनेत्री होण्यापूर्वी मी माझ्या आईच्या नर्सरीमध्ये लहान मुलांचे डायपर्स बदलण्याचे काम करत असे, असे तिने सांगितले.

- Advertisement -

एम. एस. धोनी – द अनटोल्ड स्टोरी, कबीर सिंग यासारख्या चित्रपटात झळकलेली कियारा लवकरच दिग्दर्शक राज मेहता यांच्या गुड न्यूज चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती दिलजीत दोसांज या अभिनेत्यासोबत काम करणार आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर आणि दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत. याला प्रेक्षकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisement -

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये कियारा म्हणाली की, “अभिनेत्री होण्यापूर्वी मी माझ्या आईच्या नर्सरीमध्ये जात असे. सकाळी ७ वाजताच ती नर्सरीमध्ये पोहोचत असे. तिथे ती लहान मुलांमध्ये रमत असे. त्या लहानग्यांना गाणी शिकवणे, मुळाक्षरं शिकवण्याबरोबरच त्यांचे डायपर्ससुद्धा बदलण्याचे काम मी करत असे.” ती पुढे म्हणाली की, “मला लहान मुलं प्रचंड आवडतात. आणि ज्या दिवशी मला माझं स्वतःचं मुल होईल तो दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असेल.”

दरम्यान कियाराप्रमाणेच गुड न्यूजमध्ये अक्षय कुमार आणि करिना कपूर खान सुद्धा दिसणार आहेत. २७ डिसेंबर रोजी गुड न्यूज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -