घरमनोरंजनबिग बॉसच्या घरात 'पुढचं पाऊल', 'अक्कासाहेबां'ची एन्ट्री!

बिग बॉसच्या घरात ‘पुढचं पाऊल’, ‘अक्कासाहेबां’ची एन्ट्री!

Subscribe

‘बिग बॉस’ च्या घरात मराठी कलाकारांनी चांगलाच धुमाकूळ घातलाय. पहिल्या आठवड्यापासूनच घरामध्ये दोन ग्रुप्स पडलेय. आता प्रेक्षकांना ‘पुढचं पाऊल’ च आख्खं कुटुंब ‘बिग बॉस’च्या घरात वावरताना दिसणार आहे. अक्कासाहेब ऊर्फ हर्षदा खानविलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री आज ‘बिग बॉस’मध्ये होणार आहे. मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री हर्षदा स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे.

आज बिग बॉसच्या घरात आस्ताद काळेचा वाढदिवस साजरा होत आहे. अक्कासाहेबांच्या रुपाने आस्तादला स्पेशल बर्थडे मिळणार आहे. त्यामुळे टीव्हीवर गाजलेली मालिका ‘पुढचं पाऊलं’ मधील तिन्ही कलाकार बिग बॉगच्या घरात एकत्र आले आहेत. जुई गडकरी, आस्ताद आणि वाइल्ड कार्ड एन्ट्री झालेली हर्षदा पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळतील.
आस्ताद काळेच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. १७ मे रोजी आस्तादने वयाची ३५ वर्षे पूर्ण केली. यानिमित्ताने बिग बॉसने आस्तादच्या बालपणीचा फोटो लावलेला केक घरात पाठवला असून सर्वच सदस्य मोठ्या दणक्यात आस्तादचा वाढदिवस साजरा करताना दिसतील.

- Advertisement -

हर्षदा ही रेशम टिपनिस, सुशांत शेलार यांचीही जीवाभावाची मैत्रीण आहे. तिच्या आगमनाने घरातील अनेक सदस्य भलतेच खुशीत दिसले. पण हर्षदाच्या येण्याने घरात कोणकोणत्या घडामोडी घडणार, त्या मेघा, सई, उषा नाडकर्णी, ऋतुजा धर्माधिकारी यांच्यासह घरातील इतर सदस्यांसोबत कसे जुळवून घेणार, हे बघणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -