‘ही’ अभिनेत्री आता दिसणार मिसेस मुख्यमंत्री या मालिकेत!

mumbai

झी मराठी वाहिनीवरील मिसेस मुख्यमंत्री ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. त्यातील सुमी आणि समरचं या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना त्यांच्यापैकीच एक वाटतात. पण आता या मालिकेतील अजून एक नवीन एंट्री झाली आहे.

या अभिनेत्रीला मालिकेत पाहून प्रेक्षकांना सुखद धक्काच बसला. हि अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. हेमांगी कवी मिसेस मुख्यमंत्री मालिकेत धनश्री शिंदे नावाची व्यक्तिरेखा साकारतेय. कथानकात अचानक एंट्री झालेल्या धनश्रीचा काही उद्देश आहे कि खरंच ती जशी दिसते तशी साधीभोळी आहे हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल. एकीकडे सुमी आणि दुसरीकडे धनश्री या दोघी समरच्या आईसाहेबांच्या आयुष्यात काय उलथापालथ करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

View this post on Instagram

आमची लाडकी आणि प्रिय मैत्रीण नेहा पेंडसेचं लग्न पुण्यात थाटामाटात पार पडलं. संगीत रजनी, साखरपुडा आणि लग्न अश्या तीन दिवसीय आलिशान विवाहसोहळ्यात खूप मज्जा आली. तीन ही दिवस themebased पेहराव होते. त्याचे photos social media वर post केल्यामुळे हे पेहराव बऱ्याच लोकांना आवडले त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि त्या पेहरावांच्या details बद्दल खूप जणांनी विचारलं. So त्याचे details मी इथे देतेय. Day 1 : Sangeet Night Theme : Indo Western Blouse : Denim Crop top Saree : Cotton saree from @chidiyaaonline Make-up, Hair n Styling by me. Pc : @saneshashank Day 2 : The Sundowner ( Engagement Ceremony ) Theme : Smart Casuals Top : @zara @zaraindiaofficial Skirt : @zara Make-up, Hair n Styling by me. Pc : @danadedisha Day 3 : Saptpadi Theme : Indian Traditional Saree: Brocade benarsi silk saree from local Benaras shop Make-up, Hair n Styling by me. @suhaslakhan धन्यवाद! #nehhawedshardul #foreveralways

A post shared by Hemangii Kavi (@hemangiikavi) on

या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना हेमांगी म्हणाली, “मिसेस मुख्यमंत्री सारख्या लोकप्रिय मालिकेत मी एक नवीन व्यक्तिरेखा साकारतेय आणि त्यासाठी पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळले याचा मला खूप आनंद आहे. मी खूप उत्सुक आहे प्रेक्षकांचा धनश्रीला कसा प्रतिसाद मिळतो हे जाणून घ्यायला. ही एक वेगळी भूमिका आहे जी मला पडद्यावर साकारताना खूप मजा येतेय त्यामुळे प्रेक्षकांना पण ती जरूर आवडेल अशी मी आशा करते.”