घरमनोरंजनबॉलिवूड अभिनेत्री कोयना मित्रा तुरुंगात

बॉलिवूड अभिनेत्री कोयना मित्रा तुरुंगात

Subscribe

तीन लाखांचा चेक बाऊन्स केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

तीन लाखांचा चेक बाऊन्स केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मॉडेल पूनम सेठीने २०१३ मध्ये अभिनेत्री कोयना मित्राविरोधात तक्रार केली होती. ज्या तक्रारीनंतर १ लाख ६४ हजारांच्या व्याजासह एकूण ४ लाख ६४ हजार रुपये देण्यात यावेत, असे आदेशही दंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?

पूनम सेठीने २०१३ मध्ये कोयनाने पूनम सेठी या महिलेकडून २२ लाख रुपये उधार घेतले होते. पण ते परत करताना तिने रोख रक्कम न देता तीन लाख रुपयांचा चेक दिला. पण तो चेकही बाऊन्स झाल्याने पूनम यांनी कोयना विरोधात न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, कोयना मित्राविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

काय म्हणाली कोयना

हे सगळे प्रकरण खोटे असून मला यात गोवले गेले आहे. तसेच २२ लाख रुपये मला उधार देण्याएवढी पूनमची आर्थिक स्थिती नाही. सुनावणीच्या वेळी माझे वकील न्यायालयात हजर होऊ शकले नाहीत. त्यामुळे माझी बाजू न्यायालयाने ऐकून घेतली नाही. माझी बाजू ऐकून न घेताच मला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्या निकालाविरोधात मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.


हेही वाचा – पती निकसोबत स्मोकिंग केल्यावर ट्रोल झाली देसी गर्ल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -