घरमनोरंजनअभिनेत्री मिनिषा लांबा 'मिरर मिरर'मधून रंगभूमीवर दाखल

अभिनेत्री मिनिषा लांबा ‘मिरर मिरर’मधून रंगभूमीवर दाखल

Subscribe

अभिनेत्री मिनिषा लांबा आता रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. 'मिरर मिरर' या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे नाटक मुंबईत दाखल होत असून १ ऑक्टोबरपासून एनसीपीएमध्ये दाखवले जाणार आहे.

एजीपी वर्ल्ड या नाट्यनिर्मिती कंपनीने सैफ हैदर हसन दिग्दर्शित ‘मिरर मिरर’ हे नाटक मुंबईत आणले आहे. या नाटकातून बॉलीवूड अभिनेत्री मिनिषा लांबा नाट्यभूमीवर पदार्पण करणार आहेत. अतिशय कल्पक आणि उत्तम प्रकारे तयार करण्यात आलेले ‘मिरर मिरर’ हे नाटक मुंबईकरांसाठी एनपीसीएमध्ये येत्या, १ ऑक्टोबरपासून दाखल होत आहे. भावंडांमधील चढाओढीची ही गोष्ट आहे. या नाटकात मिनल आणि मान्या या अगदी सारख्या दिसणाऱ्या जुळ्या बहिणींचे नातेसंबंध दर्शवण्यात आले आहेत. विशिष्ट परिस्थितीमुळे एखाद्या स्त्रीचे नशीब पूर्णपणे बदलून जाते, त्याची ही कहाणी आहे.

मिरर मिरर, ही एक मानसशास्त्रीय रोलर कोस्टर साइट आहे. ती प्रेक्षकांना त्यांच्या सीटवरून हलू देणार नाही. हे नाट्य म्हणजे कलाकारांसाठी उत्तम एक्सरसाइज आहे. एकावेळेस पडद्यावर १३ वेगवेगळी पात्रं साकारण ही सोपी गोष्ट नाही. मुंबईत होणाऱ्या प्रीमियर शोसाठी मी अतिशय उत्सुक आहे.
– सैफ हैदर हसन, दिग्दर्शक

- Advertisement -

मिनिषा लांबा त्यांच्या पहिल्याच नाटकात प्रमुख भूमिका साकारत आहेत आणि त्यांचा कलाविष्कार प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल आणि मिनिषा यांचा अभिनय पाहात राहावा असे प्रेक्षकांना वाटेल. खुर्चीवर खिळवून ठेवणारे हे नाटक तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत गुंतवून ठेवेल.
– अश्विन गिडवानी, एजीपी वर्ल्डचे निर्माते-एमडी

काय आहे ‘मिरर मिरर’ नाटक

mirror mirror play poster
मिरर मिरर नाटकाच्या पोस्टरवर मिनिषा लांबा

‘मिरर मिरर’ ही एक जुळ्या बहिणींची कथा आहे, विचारवंतांनी गौरवलेले दिग्दर्शक सैफ हैदर हसन यांनी ती दिग्दर्शित केली आहे. ७५ मिनिटांचा एकपात्री अभिनय असलेले हे नाट्य मिनल आणि मान्या या बहिणींच्या नातेसंबंधांवर प्रकाश टाकते आणि ही भूमिका मिनिषा लांबा यांनी साकारली आहे. या नाटकात त्यांनी विविध पात्रं साकारली आहेत. मिनलचे लहानपण अतिशय मजेत चालले आहे. मात्र, आजवर काकांकडे असलेली तिची बहिण मान्या घरी येते आणि सगळं बदलून जातं. मिनलचं आजवरच बालपण पूर्णपणे बदललं आहे. तिच्यात कटुतेची बिजे रोवली गेली आहेत. मोठी होत असताना तिला सतत मान्याच्या सावलीखाली दबल्यासारखं वाटतंय. मान्याला आपल्यापेक्षा जास्त प्रेम केल्याबद्दल, महत्त्व दिल्याबद्दल ती तिचे पालक, शिक्षक आणि मित्र-मैत्रिणी सर्वांनाच दोष देते. किशोरावस्थेत शारीरिक संबंध आल्यावर तिचं नशीबच बदलून गेल्याचं मिनलच्या लक्षात येतं. ते नशीब ज्याचा शिल्पकार तिला व्हायचं असतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -