पाहा प्रतीक्षा लोणकरला खलनायिकेच्या भूमिकेत

पाहा प्रतीक्षा लोणकरला खलनायिकेच्या भूमिकेत

सोनी मराठी वाहिनीवरल्या ‘जिगरबाज’ या नवीन मालिकेत सत्तेविरुद्ध सत्याचा संघर्ष पाहायला मिळेल. डॉक्टरांचं आयुष्य आणि एका आडगावातल्या हॉस्पिटलची गरज आणि त्यावर होणारा सत्तासंघर्ष यावर ‘जिगरबाज’ या मालिकेची गोष्ट आहे. या मालिकेत प्रतीक्षा लोणकर, अरुण नलावडे, पल्लवी पाटील असे कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. यांच्याबरोबरच अमृता पवार, श्रेयस राजे आणि विजय पाटील हे तरुण चेहरेही प्रेक्षकांच्या भेटीला येतील.

प्रतीक्षा लोणकर ही हुरहुन्नरी आणि गुणी अभिनेत्री आहे, या आधीही तिने अनेक मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘जिगरबाज’मध्ये प्रतीक्षा लोणकर मॅडम देशमुख ही व्यक्तिरेखा साकारत आहे. ही व्यक्तिरेखा नकारात्मक आहे. मॅडम देशमुख ही एक कारस्थानी बाई आहे आणि गावातल्या लोक-आधार या एकमेव हॉस्पिटलची मालकीणही आहे. आपल्या स्वार्थसाठी गावातलं एकमेव हॉस्पिटल बंद करून ती जागा तिला कमर्शियल सेंटरसाठी द्यायची आहे.
आधी साध्या सालस अशा भूमिका केलेली प्रतीक्षा या खलनायकी व्यक्तिरेखेत कशी दिसेल, हे प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.

यापूर्वी प्रतीक्षा लोणकरने झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत काम केले आहे. या मालिकेत प्रतीक्षा लोणकरने ‘राजमाता जिजाऊ’ची भूमिका साकारली होती.


हेही वाचा – उपचार घेत असताना प्रभुदेवा डॉक्टरच्या पडला प्रेमात, लॉकडाऊनमध्ये उरकले लग्न