घरट्रेंडिंगदेसी गर्ल शिकवतेय सोप्या पद्धतीने साडी नेसायला; व्हिडिओला चाहत्यांची पसंती

देसी गर्ल शिकवतेय सोप्या पद्धतीने साडी नेसायला; व्हिडिओला चाहत्यांची पसंती

Subscribe

देसी गर्ल आता हॉलिवूडच्या कलाकारांना भारतीय संस्कृती आणि परंपरा शिकवण्याच्या तयारीत आहे.

बॉलिवूड पासून अगदी हॉलिवूड विश्वात आपल्या देसी अंदाज दाखवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. Met Gala 2019 इव्हेंटमध्ये प्रियांकाच्या वेगळ्याच अंदाजामुळे अनेक नेटकऱ्यांनी प्रियांकाला चांगलेच ट्रोल केले होते. हिच देसी गर्ल प्रियांका चोप्रा आता हॉलिवूडच्या कलाकारांना भारतीय संस्कृती आणि परंपरा शिकवण्याच्या तयारीत आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये प्रियांका फक्त तीन सेफ्टी पिनांचा वापर करत लवकर साडी कशी नेसायची हे शिकवत आहे. हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होणाऱ्या व्हिडिओला चाहत्यांसोबत नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

View this post on Instagram

InStyle, July 2019.

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

- Advertisement -

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला टीम प्रियांकाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. टीम प्रियांकाने या व्हिडिओला शेअर करताना ‘Saree not sorry! Saree tutorials 101!’ असे हटके कॅप्शन दिले आहे.

View this post on Instagram

? #Cannes2019

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

बॉलिवूडसह हॉलिवूडच्या चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्रीच्या व्हिडिओवर चाहते मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -