घरमनोरंजनप्रियांका चोप्रा 'या' बाबतीतही ठरली अव्वल!

प्रियांका चोप्रा ‘या’ बाबतीतही ठरली अव्वल!

Subscribe

यामध्ये तिने बॉलीवूडमधील खान मंडळींसह बिग बींना सुद्धा मागे टाकले आहे.

बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंतचा अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा प्रवास थक्क करणारा आहे. अभिनया बरोबरच विविध कारणांमुळे प्रियांका सतत चर्चेत असते. आता तर ती जगातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांच्या यादीत विराजमान झाली आहे. याबरोबच प्रियांका चोप्रा बाबत आणखी एक चांगली बातमी समोर आली आहे. जगभरात गुगलवर सर्वात जास्त वेळा सर्च करण्यात आलेल्या अभिनेत्रींमध्ये प्रियांका अव्वल ठरली आहे. यामध्ये तिने बॉलीवूडमधील खान मंडळींसह बिग बींना सुद्धा मागे टाकले आहे.

- Advertisement -

सेमरूशचे सर्वेक्षण

ऑक्टोबर २०१९ रोजी झालेल्या सर्वेक्षणात बॉलिवूडच्या ‘देसी गर्ल’ला २.७२ मिलियन पेक्षा जास्त ऑनलाइन सर्च करण्यात आलं आहे. या यादीत प्रियांका नंतर अभिनेता सलमान खानचं नाव आहे. सेमरूशकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात, भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्राने जगातील असंख्य चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवल्याचे सांगितले आहे. या सर्वेक्षणात प्रियांका उच्च स्थानावर आहे. तर सादर करण्यात आलेला हा अहवाल ऑक्टोबर २०१८ ते ऑक्टोबर २०१९ मधील आहे. शिवाय, प्रत्येक महिन्यात गुगलवर प्रियांकाला ४.२ मिलियन चाहते सर्च करतात. या सर्वेक्षणात प्रियांकानंतर अभिनेत्री सनी लियोनी आणि दीपिका पादुकोन यांची नावे आहेत. तर भारतीय अभिनेत्यांमध्ये सलमान खान पहिल्या क्रमांकावर आहे. सलमाननंतर शाहरूख खान सर्वात जास्तवेळा सर्च करण्यात येणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तर बॉलिवूडचे महानायक या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत.

View this post on Instagram

Me and my friends ?#karvachauth2019

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -