ड्रग्ज टेस्टमध्ये सापडू नये म्हणून अभिनेत्रीने युरिनमध्ये मिसळलं पाणी

Ragini dwivedi
कन्नड अभिनेत्री रागिनी द्विवेदी

सँडलवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणात अटक असलेल्या अभिनेत्री रागिनी द्विवेदीने मेडिकल टेस्टदरम्यान पुराव्याशी छेडछाड केल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे ड्रग्ज टेस्टसाठी अभिनेत्री रागिनी द्विवेदीचे युरिन सँपल घेण्यात आले होते. मात्र अभिनेत्रीने हे सँपल देत असताना त्यात पाणी मिसळून सँपलसोबत छेडछाड केली. याआधी ड्रग्ज पेडलिंग प्रकरणात रागिणीला १४ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. युरिन टेस्टद्वारे संबंधइत व्यक्तीने ड्रग्जचे सेवन केले आहे की नाही, याचा तपास केला जातो. मात्र त्यात पाणी मिसळल्यानंतर रिपोर्ट चुकीचा येतो.

ड्रग्ज टेस्टसाठी रागिणीला बंगळुरुच्या केसी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. जिथे तिला युरिन सँपल द्यायचे होते. मात्र रागिणीने त्यात पाणी मिसळून सँपल खराब केले. डॉक्टरांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच पोलिसांना सँपल खराब झाल्याची माहिती दिली. यानंतर रागिणीला पुन्हा युरिन सँपल देण्यास सांगितले. यावेळी तिने सँपल खराब करु नये, अशी सक्त ताकीद देण्यात आली होती. एवढंच नाही तर तपासासाठी रागिणीच्या केसांचे सँपल देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सँपल हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

केसांच्या सँपलद्वारे मागच्या चार-पाच महिन्यात ड्रग्ज घेतले आहे की नाही? याचा तपास लागू शकतो, असे पोलिसांनी सांगितले. मागच्या आठवड्यात रागिणी द्विवेदीला NDPS कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. वीरन खन्ना या हायप्रोफाईल पार्ट्यांचा आयोजकासोबत रागिणीचे संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली होती. रागिणीचा जन्म बंगळुरु येथे झाला आहे. २००९ साली तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. वीरा मदाकारी, केम्पे गौडा, रागिनी आयपीएस, बंगारी आणि शिवा यासारख्या सिनेमांमधून तिने काम केले आहे.