घरमनोरंजनसखीच्या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली - ऋचा आपटे

सखीच्या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली – ऋचा आपटे

Subscribe

छोट्या पडद्यावरील लोकप्रीय मालिका तुझ्यात जीव रंगला यामध्ये सखी या नवीन व्यक्तिरेखेची एंट्री झाली आहे. ही भूमिका अभिनेत्री ऋचा आपटे साकारत असून यासाठी तिने भरपूर मेहनत घेतल्याचे सांगितले आहे.

राणादा आणि पाठकबाई ही छोट्या पडद्यावरील लोकप्रीय जोडी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते. ही जोडी प्रेक्षकांमध्ये खुपच लोकप्रीय आहे. नुकतेच या मालिकेत एका नवीन व्यक्तीरेखेने प्रवेश केला आहे. राणादाला मॅटवरची कुस्ती शिकवणाऱ्या सखी म्हणजेच ऋचा आपटेची. राणा त्याच्या नंदिता वहिनींचा शब्द पाळण्यासाठी त्याच्या मनाविरुद्ध मॅटवरची कुस्ती खेळायला राजी झाला आणि त्यात मुलींपासून कायम दूर राहणाऱ्या राणाला मॅटवरची कुस्ती शिकवण्यासाठी एक लेडी मॅनेजर म्हणजेच सखी आल्यामुळे त्याची चांगलीच पळापळ सुरु आहे.

सखीच्या भूमिकेत ऋचा आपटे

सखीची व्यक्तीरेखा अभिनेत्री ऋचा आपटे साकारत असून राणाला मॅटवरील कुस्तीचे धडे देणारी सखी प्रेक्षकांनी पाहली आणि ही धाडसी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरली. राणाला कुस्तीचे सल्ले देताना ती राणाशी कठोरपणे बोलते. वेळ पडली तर त्याचा अपमान देखील करते आणि तिचा हाच स्पष्टवक्तेपणा प्रेक्षकांना भावला आहे.

सखी ही खूप प्रॅक्टिकल मुलगी आहे. एक शहरी मुलगी जी राणाला मॅटवरील कुस्तीचे छक्केपंजे शिकवायला कोल्हापुरात आली आहे. अशी भूमिका मी या आधी कधीही साकारली नाही. त्यामुळे ती माझ्यासाठी खुप आव्हानात्मक आहे आणि मी या भूमिकेतून बरचं काही शिकत आहे. माझ्या देहबोलीतून कुस्तीपटू साकारणं मी शिकत आहे. खुपच कमी वेळात मी कुस्तीचं ट्रेनिंग घेतलं आणि ते सीन्समध्ये दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. नुकतेच मालिकेत दाखवल्याप्रमाणे मी राणाला तीन वेळा जमिनीवर पाडते. त्या सीनच्या वेळी राणाने मला सांभाळून घेतलं. त्याला बऱ्यापैकी कुस्ती जमते आणि त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना तो मला सांभाळून घेत आहे.
– ऋचा आपटे, अभिनेत्री

- Advertisement -

सखीसाठी खास मेहनत

ऑनस्क्रीन भोळा तसेच रांगडा दिसणारा पेहलवान पठ्ठा राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खुप लक्ष देतो. त्याचप्रमाणे सखीलाही आपल्या डाएटकडे विशेष लक्ष द्यावं लागतं आहे. या व्यक्तिरेखेसाठी ऋचा मेहनत देखील घेत आहे. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार याचे काटेकोर पालन ऋचा सध्या करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -