घरमनोरंजनअभिनेत्री सविता मालपेकर करणार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश

अभिनेत्री सविता मालपेकर करणार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश

Subscribe

ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर उद्या, ९ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता राष्ट्रवादीच्या मुंबईच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुख्य उपस्थिती जाहीर प्रवेश करणार आहेत. अशी माहिती त्यांनी जनसंपर्क न्यूजला दिली. अभिनेत्री सविता मालपेकर यांनी १९८८ मध्ये ‘आई पाहिजे’ चित्रपटातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. ‘गाढवाचं लग्न’ या नाटकातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. ‘काकस्पर्श’ सिनेमात आत्याच्या भूमिकेसाठी त्यांनी डोक्यावरील संपूर्ण केस काढले होते. याशिवाय त्यांनी अनेक मराठी नाटक-मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनीही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. लॉकडाऊनच्या काळात पुण्यामध्ये प्रिया बेर्डे यांनी सुप्रीया सुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला होता. आता आणखी एक मराठमोळी अभिनेत्री राजकीय क्षेत्रात पदार्पण करत आहे.

- Advertisement -

अ. ब. क, हाहाकार, कुंकू लावते माहेरचं, गड्या आपला गाव बरा, स्वामी पब्लिक लिमिटेड, नटसम्राट, मुळशी पॅटर्न, शिकारी, मी शिवाजी पार्क, ७ रोशन व्हिला अशा सिनेमात त्यांनी भूमिका केल्या आहेत. ‘हथियार’ या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. सविता मालपेकर सध्या स्टार प्रवाहवरील “मुलगी झाली हो” या मालिकेत खाष्ट सासूची भूमिका साकारत असून तब्बल ७ वर्षांनंतर त्या सासूची भूमिका साकारत आहेत.

हेही वाचा –

चिंताजनक! पुण्यात २ लाख कोरोनाबाधित; देशातील सर्वाधिक रुग्णसंख्येचा पहिला जिल्हा ठरला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -