घरमनोरंजनअभिनेत्री शमिता शेट्टीच्या कारचालकाला मारहाण

अभिनेत्री शमिता शेट्टीच्या कारचालकाला मारहाण

Subscribe

ठाण्यातील कॅडबरी पुलावर शमिता शेट्टीच्या गाडीला पाठीमागून येणाऱ्या गाडीने धडक दिली. यावरुन शमिताच्या कारचालकाने आरोपी चालक आणि त्याच्या दोन साथीदारांना जाब विचारला. यावरुन आरोपींनी शमितासह तिच्या कार चालकाला शिविगाळ करत मारहाण केली.

अभिनेत्री शमिता शेट्टी हिला शिविगाळ करण्यात आली आहे तसंच तिच्या कारचालकाला मारहाण करण्यात आली आहे. ही घटना ठाण्याच्या विवियाना मॉलजवळ मंगळवारी दुपारी घडली आहे. शमिता शेट्टी कामानिमित्त अंधेरीवरुन बीएमडब्ल्यू गाडीने ठाण्यात आली होती. ठाण्यातील कॅडबरी पुलावर तिच्या गाडीला पाठीमागून येणाऱ्या गाडीने धडक दिली. यावरुन शमिताच्या कारचालकाने आरोपी चालक आणि त्याच्या दोन साथीदारांना जाब विचारला. यावरुन आरोपींनी शमितासह तिच्या कार चालकाला शिविगाळ करत मारहाण केली. ऐवढ्यावरच न थांबता आरोपींनी शमिताच्या कार चालकाला धमकी देखील दिली. याप्रकरणी ठाण्याच्या राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शमिता शेट्टी ही अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण आहे.

अभिनेत्री शमिता शेट्टीला मंगळवारी दुपारी अंधेरीवरुन ठाण्यात आले होते. ठाण्याच्या कॅडबरी पुलावरुन उतरताना पाठीमागून आलेल्या एका गाडीने शमिता शेट्टीच्या गाडीला धडक दिली. शमिता शेट्टीच्या चालक सावंत यांनी गाडी बाजूला लावत असताना मागून धडक दिलेल्या गाडी चालकाने शमिता शेट्टीच्या गाडीसमोर त्याची गाडी आडवी लावली. त्यानंतर गाडीमधून चालकासह त्याचे मित्र उतरुन आले. शमिताचा कारचालक देखील बाहेर गेला आणि त्याने गाडीला ठोकर का मारली याचा जाब विचारला असता. त्यांनी शमिताच्या चालकासोबत वाद घातला. त्यानंतर त्यांनी शमिताच्या चालकाला शिविगाळ करत मारहाण केली. त्यानंतर सावंत यांनी याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -